मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या आयपीओची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. DRHP फाइल झाल्याने लवकरच आयपीओ बाजारात येणार आहे. भारतीय शेअर मार्केटमच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. आयपीओ मार्चमध्ये येण्याची शक्यता आहे. परंतू त्याआधी एलआयसी पॉलिसी होल्डर्सच्या कामाची बातमी समोर आली आहे.
एलआयसी आयपीओमध्ये पॉलिसी होल्डर्ससाठी चांगला डिस्काउंट मिळणार आहे. एलआयसी ऍक्टनुसार पॉलिसी होल्डर्सला 10 टक्क्यांची सूट मिळू शकते. डिस्काउंट किती असेल याबाबतचा निर्णय वॅल्यूएशन निश्चित झाल्यानंतर होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत आयपीओ होल्डर्ससाठी साधारण 10 टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्यात येणार आहे.
सरकारने एलआयसी आयपीओ जाहीर केल्यानंतर म्हटले की, इश्यू साइजमध्ये 10 टक्के भाग पॉलिसी होल्डरसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यामुळे इतर गुंतवणूकदारांपेक्षा पॉलिसी होल्डर्सला फायदा होणार आहे.