जंगलाच्या राजाला भिडला रान डुक्कर, सिंहाने केलेल्या शिकारीचा थरारक व्हिडीओ

सिंह आणि रान डुक्कर यांच्यातील शिकारीचा खेळ दाखवणारा पाहा व्हिडीओ

Updated: Jun 13, 2021, 03:21 PM IST
जंगलाच्या राजाला भिडला रान डुक्कर, सिंहाने केलेल्या शिकारीचा थरारक व्हिडीओ

मुंबई: वाघाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. जंगलाचा राजा सिंहाला जेव्हा रान डुक्कर भिडतो तेव्हा त्याचे परिणाम काय होतात हे सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंहाने केलेल्या रान डुकराच्या शिकारा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा शिकारीचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की सिंहाने रान डुकरांची मोठ्या शिताफीने शिकार केली. रान डुकराच्या शिंगाला पकडून त्याने खेचत आणलं. रान डुक्कर देखील आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. मात्र सिंहाने त्याला फरफटत आणलं आणि त्याच्या मानेवर हल्ला केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by hayat_vahsh (@hayat_vahshii)

शिकारीचा हा थरारक व्हिडीओ hayat_vahshii नावाच्या तरुणानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओवर खूप कमेंटस युझर्सनी केल्या आहेत. शिकारीचा हा थरार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या इन्स्टाग्रामवर वाघ, बिबट्या आणि सिंहाच्या शिकारीचे आणखी काही व्हिडीओ देखील अपलोड केल्याचं दिसत आहे. त्याच्या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. सिंह आणि रान डुकराच्या शिकारीचा थरार अंगावर काटा आणणारा आहे.