दुहेरी हत्येने खळबळ, लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; पोलीसही चक्रावलेत

लिव्ह-इनमध्ये (Live In Relationship) राहत असल्याचा जोडप्याची हत्या (couple murder) करण्यात आल्याने एकच खळबड उडाली आहे. 

Updated: Jul 30, 2021, 06:52 AM IST
दुहेरी हत्येने खळबळ, लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; पोलीसही चक्रावलेत

मुंबई : लिव्ह-इनमध्ये (Live In Relationship) राहत असल्याचा जोडप्याची हत्या (couple murder) करण्यात आल्याने एकच खळबड उडाली आहे. या दोघांचे हात पाठिमागे तारांनी बांधलेले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, ही दुहेरी हत्या (double murder) का करण्यात आली, याची माहिती मिळू शकलेली नाही.

देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) रोहिणी भागातील एका खोलीतून संशयास्पद स्थितीत एका युवकाचा आणि एका तरुणीचा मृतदेह सापडला. यामुळे संपूर्ण सेक्टर -32 मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे, आणि स्वतः घटनेचा तपास सुरु केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवक आणि मुलगी पूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये  (Live In Relationship) बऱ्याच काळापासून एकत्र राहत होते. पोलीस पथकाच्या मते, मृतदेहाची स्थिती पाहून असे वाटते की त्यांचा 4-5 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा. दोघांनाही छळ करुन ठार मारण्यात आले आहे, अशी पोलिसांची माहिती आहे. मृत शरीराचे हात मागील बाजूस विद्युत तारांनी बांधलेले होते. प्रथमदर्शनी पोलिसा हा हत्येचा प्रकार वाटत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर या हत्येचा उलगडा होईल की, कशामुळे खून झाला आहे. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे.