Aditya L1 Mission LIVE: आदित्य L-1 सुर्याच्या दिशेने झेपावले, करणार 15 लाख किमीचा प्रवास

ADITYA-L1 MISSION ISRO LIVE : चांद्रयानाला मिळणारं यश पचवत इस्रोनं लगेचच आणखी एका महत्त्वपूर्ण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. ही मोहिम आहे आदिच्य एल1 अर्थात इस्रोची सूर्य मोहिम.   

Aditya L1 Mission LIVE: आदित्य L-1 सुर्याच्या दिशेने झेपावले, करणार 15 लाख किमीचा प्रवास

ADITYA-L1 MISSION ISRO LIVE : जगभरातील महासत्ता असणाऱ्या राष्ट्रांच्या यादीमध्ये स्थान मिळवू पाहणारा भारत देश सध्या सर्वांगीण विकासाच्याच दिशेनं पावलं टाकताना दिसत आहे. प्रत्येक क्षेत्रात देशाची उल्लेखनीय कामगिरी संपूर्ण जगाचं लक्ष वेधत आहे. कला, क्रीडा म्हणू नका किंवा संशोधन. भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं असून त्यांच्या कामाची दखल जागतिक स्तरावर घेतली जात आहे. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या मोहिमांकडे असणाऱ्या जगाच्या नजरा पाहता ही बाब अगदी सहजपणे लक्षात येते. 14 जुलै 2023 रोजी भारतानं चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेनं पाठवलं आणि साधारण 45 दिवसांच्या कालावधीत या यानानं चंद्राचा दक्षिण ध्रुव गाठला. असं करणारा भारत पहिला देश आणि चंद्र गाठणारा चौथा देश ठरला. तिथं चांद्रयान मोहिमेतून अनेक पैलू असणारी चंद्राविषयीची महिती विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर इस्रोकडे पाठवत असतानाच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. सूर्य मोहिम अर्थात आदित्य एल1 असं या मोहिमेचं नाव असून, 2 सप्टेंबर 23 रोजी श्रीहरिकोटा येथून भारताच्या या सूर्यमोहिमेसाठीचं यान अवकाशाच्या दिशेनं झेप घेत आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या Live Updates, इस्रोच्या कार्यालयातील माहिती, आणि संशोधकांमध्ये असणारा उत्साह तुम्हाला इथं पाहता येणार आहे. 

2 Sep 2023, 11:51 वाजता

Aditya L1 Launch Live: आदित्य L-1 सुर्याच्या दिशेने झेपावले

2 Sep 2023, 11:50 वाजता

मिशन लॉन्चिंगला ग्रीन सिग्नल 
या मोहिमेला हिरवा कंदील देण्यात आला आहे. थोड्याच वेळात रॉकेट आगीचा गोळा सोडत अवकाशाच्या दिशेने उडेल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहही तेथे पोहोचले आहेत.

2 Sep 2023, 11:40 वाजता

Aditya L1 Launch Live: आदित्य L-1 लाँच पाहण्यासाठी लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
ISRO च्या पहिल्या सौर मिशन आदित्य L-1 चे प्रक्षेपण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) SHAR, श्रीहरिकोटा येथे पोहोचले आहेत. श्रीहरिकोटाचा हा व्हिडिओ येथे पहा.

2 Sep 2023, 11:21 वाजता

मिशन लॉन्चिंगची तयारी पूर्ण

2 Sep 2023, 11:11 वाजता

'हे मिशन खूप महत्त्वाचे आहे. आदित्य एल-1 हे लॅग्रॅन्गियन पॉइंट-1 च्या आजूबाजूला ठेवले जाईल, जिथे पृथ्वी आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती जवळजवळ कमी होईल आणि कमीतकमी इंधनासह, तेथे अंतराळ यानाची देखभाल करता येईल. शिवाय, तेथून सुर्याचे 24/7 निरीक्षण शक्य आहे.अंतराळ यानात सात उपकरणे बसवण्यात आली आहेत. या मिशनचा डेटा वातावरणात घडणाऱ्या सर्व घटना, हवामान बदलाचा अभ्यास इत्यादी समजून घेण्यास मदत करेल, अशी प्रतिक्रिया इस्रोचे माजी चेअरमन जी. माधवन नायर यांनी दिली.

2 Sep 2023, 11:00 वाजता

इस्रोचे माजी चेअरमन जी. माधवन नायर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

2 Sep 2023, 07:27 वाजता

ADITYA-L1 MISSION ISRO LIVE : सूर्य मोहिमेमध्ये इस्रोपुढं महत्त्वाचं आव्हान असणार आहे ते म्हणजे सूर्याच्या लँग्रेज पॉईंटपर्यंत पोहोचण्याची. शिवाय यानाला योग्य कक्षेत पोहोचवणंही जोखमीचं काम ठरणार आहे. 

 

2 Sep 2023, 07:26 वाजता

ADITYA-L1 MISSION ISRO LIVE : सूर्य मोहिमेमध्ये इस्रोपुढं महत्त्वाचं आव्हान असणार आहे ते म्हणजे सूर्याच्या लँग्रेज पॉईंटपर्यंत पोहोचण्याची. शिवाय यानाला योग्य कक्षेत पोहोचवणंही जोखमीचं काम ठरणार आहे. 

 

2 Sep 2023, 06:38 वाजता

ADITYA-L1 MISSION ISRO LIVE : भारतातील पहिली सूर्यमोहिम शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर 2023 ला सूर्याच्या दिशेनं झेपावणार आहे. श्रीहरिकोटा येथून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी हे यान प्रक्षेपित केलं जाईल. ज्यानंतर 125 दिवसांनी ते निर्धारित स्थळी म्हणजेच टार्गेट पॉईंटवर पोहोचणार आहे. जवळपास 4 महिन्यांच्या या प्रवासात यान 15 लाख किलोमीटर इतकं अंतर ओलांडणार असून, हे अंतर चंद्राच्या तुलनेत पाच पटींनी जास्त आहे. 

हेसुद्धा वाचा : Chandrayaan-4 कधी होणार लॉन्च? ISRO चीफने दिली महत्त्वाची माहिती; पाहा Video