Rohit Sharma Press Conference : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबर पासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळणार असून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिला टेस्ट सामना पार पडेल. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांविषयी भाष्य केले. यावेळी त्याने टेस्ट सीरिजपूर्वी वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या बांगलादेश टीमच्या खेळाडूंना देखील सूचक इशारा दिला.
मागील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी 20 सिरीज खेळल्यानंतर टीम इंडिया तब्बल एक महिन्याच्या ब्रेकनंतर मैदानात उतरणार आहे. तर जानेवारीमध्ये झालेल्या टेस्ट सीरिजनंतर तब्बल 8 महिन्यांनी टीम इंडिया टेस्ट क्रिकेट खेळणार आहे. तेव्हा यात प्रतिस्पर्धी बांगलादेशला हरवण्याकरता भारताचे खेळाडू सरावादरम्यान घाम गाळताना दिसत आहेत. रोहित शर्माने मंगळवारी बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याला बांगलादेशचे खेळाडू सामन्यापूर्वी करत असलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
बांग्लादेशच्या टीमने पाकिस्तानला त्यांच्याच होम ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या टेस्ट सीरिजमध्ये धूळ चारली. त्यामुळे बांगलादेशचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे ते टीम इंडिया विरुद्ध आगामी टेस्ट सीरिजबाबत वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. याबाबत रोहितला पत्रकारांनी प्रश्न विचारला असता तो म्हणाला, "सर्व संघांना टीम इंडियाला हरवायला मजा येते, त्यांना मजा घेऊ देत. जेव्हा इंग्लंड आली होती तेव्हा त्यांनी सुद्धा प्रेसमध्ये खूप काही म्हटले होते. पण आम्ही त्यावर लक्ष देत नाही. आम्ही चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. पुढे रोहित म्हणाला की इंग्लंडने 2024 च्या टेस्ट सीरिजपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा बरीच वक्तव्य करून माइंडगेम खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण आमच्या टीमने त्यांना जास्त संधी दिल्या नाहीत.
हेही वाचा :अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा कहर, एकाच सामन्यात 9 विकेट.. टीम इंडियाचे दरवाजे उघडणार?
टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर श्रीलंके विरुद्ध वनडे आणि टी 20 सिरीज खेळली. यानंतर तब्बल एका महिन्याच्या ब्रेकनंतर टीम इंडिया टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी उतरणार आहे. रोहित शर्माने म्हंटले की एक महिन्यांनी मैदानावर पुनरागमन करताना खुलं चांगलं वाटतंय. आम्ही या टेस्ट सीरिजसाठी चांगला सराव केला असून आता मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 आणि 27 सप्टेंबर रोजी दोन सामन्यांची टेस्ट सिरीज पार पडणार आहे. तर त्यानंतर दोन्ही संघांमध्ये टी 20 सिरीज सुद्धा खेळवण्यात येईल. यातील पहिला सामना हा 6 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशच्या स्टेडियममध्ये पार पडेल.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.