Panchang 17 September 2024 in marathi : पाहुणचार पूर्ण करुन आज बाप्पा गावी निघणार आहे. अनंत चतुर्दशीला आज गणेशाच विसर्जन करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीला श्री विष्णूची पूजा करण्यात येते. हरीची वर्षभर पूजा केल्याने 14 वर्षांपर्यंत अनंत फळ प्राप्त होतं, अशी मान्यता आहे. आज दुपारी 11.46 नंतर भाद्रपद पौर्णिमा सुरु होणार आहे. त्यामुळे आज पौर्णिमा श्रद्धादेखील आहे.
आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुदर्शी तिथी आहे. पंचांगानुसार चंद्र मंगळ नववा पंचम योगसह रवि योग, धृतिमान योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कुंभ राशीत आहे. (Tuesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. मंगळवार हा दिवस गणराया आणि हनुमानजीला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Tuesday panchang 17 September 2024 panchang in marathi ganeshotsav Anant Chaturdashi Ganpati Visarjan)
वार - मंगळवार
तिथी - चतुर्दशी - 11:46:50 पर्यंत
नक्षत्र - शतभिष - 13:54:28 पर्यंत
करण - वणिज - 11:46:50 पर्यंत, विष्टि - 21:57:58 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - धृति - 07:48:02 पर्यंत, शूल - 27:41:10 पर्यंत
सूर्योदय - 06:07:10
सूर्यास्त -18:23:13
चंद्र रास - कुंभ - 29:45:27 पर्यंत
चंद्रोदय - 18:03:00
चंद्रास्त - 30:03:59
ऋतु - शरद
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:16:03
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त - 08:34:22 पासुन 09:23:26 पर्यंत
कुलिक – 13:28:47 पासुन 14:17:51 पर्यंत
कंटक – 06:56:14 पासुन 07:45:18 पर्यंत
राहु काळ – 15:19:12 पासुन 16:51:12 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:34:22 पासुन 09:23:26 पर्यंत
यमघण्ट – 10:12:30 पासुन 11:01:35 पर्यंत
यमगण्ड – 09:11:10 पासुन 10:43:11 पर्यंत
गुलिक काळ – 12:15:11 पासुन 13:47:11 पर्यंत
अभिजीत - 11:50:39 पासुन 12:39:43 पर्यंत
उत्तर
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)