Breaking News Live : खासदार कंगना राणावतची अजब मागणी, महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूटच मागितला

Breaking News LIVE: पुण्यातील एका पबच्या वॉशरूममध्ये तरुण अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने पुणे उडता पुणे झाले की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.   

Breaking News Live :  खासदार कंगना राणावतची अजब मागणी, महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूटच मागितला

Breaking News LIVE: आजपासून अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होत असून, या पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेचं कामकाज सुरू होणार आहे. याशिवायही देशात आणि राज्यात विविध घडामोडीसुद्धा सुरु असणार असून, या सर्व अपडेट्स एका क्लिकवर पाहता येणार आहेत. 

24 Jun 2024, 15:14 वाजता

Breaking News Live : विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी

अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञानाचे महत्त्व समजणारे राजू वरोकार या शेतकऱ्यानं आपल्या शेतात पेरणीचा नवा प्रयोग केला आहे. 'जीपीएस कनेक्ट' या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी सुरू आहे. सदरचा प्रयोग हा राज्यातून अकोला जिल्ह्यात पहिल्यांदा केला जात असल्याचा दावा शेतकऱ्यानं केला आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची, मजुरांची आणि पैश्याची सुद्धा बचत होत असल्याचं वरोकार म्हणत आहे.

24 Jun 2024, 14:19 वाजता

Breaking News Live : शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्याने बांधकाम कार्यालयातच भरवली शाळा

बीड माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण, पिंपरी खु, डिग्रस गावाचा रस्ता उखडल्यानं जिजामाता विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना गेल्या आठ दिवसापासून शाळेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदनं करूनही रस्ता दुरुस्त न केल्यामुळे जिजामाता विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक पालकांनी चक्क सार्वजनिक बांधकाम कार्यालयातच शाळा भरवली.. अनेक वेळा तक्रारी करून ही रस्ता दुरुस्त केला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेसाठी जाण्यासाठी हाल होत आहेत त्यामुळे संत झालेल्या पालकांनी आजचक्क सार्वजनिक बांधकाम कार्यालयातच शाळा भरवली.

24 Jun 2024, 13:45 वाजता

Breaking News Live : मुख्यमंत्री शिंदे यांचं 'ते' वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता 

'महाराष्ट्रात काही अर्बन नक्सल NGOs ने इंडिया आघाडीला छुपा पाठिंबा दिला आहे’ हे विधान मुख्यमंत्री शिंदे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण निर्भय बनो लोक-चळवळीचे एक सदस्य बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी थेट एकनाथ शिंदेंना कायदेशीर नोटिस पाठवली आहे. जर शिंदेंना महाराष्ट्रातील अनेक अर्बन नक्सल NGOs माहिती आहेत तर त्यांनी त्वरित अर्बन नक्सल असलेल्या या सगळ्या NGOs ची माहिती पोलिसांना द्यावी तसेच अशा अर्बन नक्सल सामाजिक संस्थांची यादी जनतेसमोर जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

24 Jun 2024, 13:42 वाजता

Breaking News Live : अजित पवार यांच्या भेटीला नाना पटोले

अजित पवार यांच्या भेटीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये झाली भेट. मतदार संघातील कामा निमित्त नाना पटोले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचे समजते.

24 Jun 2024, 12:41 वाजता

Breaking News Live : सर्वच पक्ष आणि राजकारणी जातीपातीमध्ये - राज ठाकरे
 

जातीवादाचं विष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतंय. मतदानासाठी हे सगळं असून समाजानं हे समजून घेणं गरजेचं. सर्वच पक्ष आणि राजकारणी जातीपातीमध्ये अडकलेले आहेत. 

24 Jun 2024, 12:14 वाजता

Breaking News LIVE: मुंबई विमानतळावर प्रवाशांचा संताप 

एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्याने प्रवासी संतप्त. सकाळी 11 वाजून 25 मिनिटांचं चे एअर इंडियाचं मुंबई दिल्ली विमान अद्याप आलेलं नाही, त्यामुळे प्रवाशांचा संताप. संतप्त प्रवासी इअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. 

24 Jun 2024, 12:12 वाजता

Breaking News LIVE: मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणणं मूर्खपणा... - लक्ष्मण हाके 

आरक्षण हे कायद्यानुसार चालत असतं. समाजाचं मागासलेपण पाहून आरक्षण मिळत असतं. कुठल्या तरी व्यक्तीनं झुंडशाहीच्या जोरदार आरक्षण मिळवण्याची भाषा करणं कायद्या विरोधात आहे ही हुकूमशाही प्रवृत्ती आहे. राज्यातील वातावरण बिघडवण्यास अशी वर्तणूक जबाबदार राहतील मंत्री आमदार खासदार ,यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी अभ्यास करूनच वक्तव्य केले पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. कायदा बनवायला जाणाऱ्या लोकांनी माहिती घेतली नसेल तर हे धोकादायक आहे असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं. 

24 Jun 2024, 11:55 वाजता

नाशिक : कडेकोट बंदोबस्तात काशपी धरणामधून पाणी सोडलं; तणाव कायम

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. गंगापूर समूहातून काशपी धरणामधून गंगापूर धरणात पाणी सोडण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. गेल्या आठवड्यापासून जलसंपदा विभाग हे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. अखेर आज पोलिसांच्या कडेकोड बंदोबस्तामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. जिल्ह्यात विविध धरणांमध्ये केवळ आठ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

24 Jun 2024, 10:44 वाजता

Breaking News LIVE: लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी पंतप्रधांनी आणीबाणीचा उल्लेख करत म्हटलं...

लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेबाहेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्य़ांनी संसदीय कामकाज सुरु होण्यापूर्वी देशाला चांगल्या विरोधकांची अपेक्षा आहे... असं वक्तव्य केलं. यावेळी मोदींनी आणीबाणीची आठवण काढत 25 जून हा दिवस कोणीही विसरू शकत नाही, आणीबाणी हा देशावरचा काळा डाग आहे, असं म्हटलं. यापूर्वीपेक्षा आपण तिपटीनं जास्त काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी देशातील जनतेला दिला. 

24 Jun 2024, 10:23 वाजता

Breaking News LIVE: लोकसभेत आता आता विरोधकांचा आवाज घुमणार- संजय राऊत 

उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकावर निशाणा साधला आहे. "आता ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो. विरोधी पक्षनेता पहिल्या बाकावर असेल. 240 चे 275 होतील हे कळणार सुद्धा नाही," असं राऊत म्हणाले.  तसेच, "आता विरोधकांचा आवाज घुमणार, मोदी शाह यांचा आवाज चालणार नाही," असंही राऊत म्हणाले.