Breaking News Live : खासदार कंगना राणावतची अजब मागणी, महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूटच मागितला

Breaking News LIVE: पुण्यातील एका पबच्या वॉशरूममध्ये तरुण अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने पुणे उडता पुणे झाले की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.   

Breaking News Live :  खासदार कंगना राणावतची अजब मागणी, महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूटच मागितला

Breaking News LIVE: आजपासून अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होत असून, या पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेचं कामकाज सुरू होणार आहे. याशिवायही देशात आणि राज्यात विविध घडामोडीसुद्धा सुरु असणार असून, या सर्व अपडेट्स एका क्लिकवर पाहता येणार आहेत. 

24 Jun 2024, 10:08 वाजता

Breaking News LIVE: पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांचा पोलिसांसह सरकारवर निशाणा

'गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठलाय. ललित पाटील प्रकरणानंतर ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडिओ काल व्हायरल झाले. पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळतेय. तर विद्येच्या माहेरघराची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर होतंय. पुणे शहर सत्ताधारी भाजप, शिंदे सरकारमुळे बदनाम होतंय', असा निशाणा जयंत पाटील यांनी साधला आहे. 

24 Jun 2024, 09:32 वाजता

Breaking News LIVE: ड्रग्ड व्हहिडीओप्रकरणी ⁠पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई 

पुण्यातील ड्रग्ज व्हायरल व्हिडिओचं प्रकरणी ⁠पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई. ⁠शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक निलंबित. ⁠पोलीस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने यांचंही निलंबन. ⁠सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई. 

24 Jun 2024, 09:31 वाजता

Breaking News LIVE: उमरगा तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

उमरगा तालुक्यातील माडज, गुगळगाव, वागदरी, कोरेगाव, कोरेगाववाडीसह परिसरातील गावात ढगफुटी सदृश्य तुफान पाऊस पडला आहे. मोठा पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून पेरणीसाठीचे बियाणे व खते सुद्धा भिजली आहेत. या पावसाचे पाणी माडज, गुगळगाव मार्गे कोरेगाव तलावात व नंतर उमरगा नदी मार्गे बेन्नीतुरा नदीत मिसळत कर्नाटक राज्यात जाते. सध्या शेतकरी यांनी सर्वत्र पेरणी केली आहे पण आताच्या ढगफुटीने शेतकरी यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

 

24 Jun 2024, 09:15 वाजता

Breaking News LIVE: वाहनाला कट मारण्यावरून संभाजीनगरात राडा 

संभाजी नगरात राजा बाजार परिसरात रविवारी मध्यरात्री झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी 30 जणांवर गुन्हे दाखल केले आहे तर सात जणांना दंगलीच्या गुन्ह्या प्रकरणी अटक केलेली आहे.. गाडीला कट का मारला या कारणावरून किरकोळ वाद झाला होता त्याचा पर्यायवासन हाणामारीत झालं होतं आणि दोन्ही बाजू कडून मोठा जमाव आमने सामने आला होता ,पोलिसांना जमाव शांत करायला पहाट उजाडली होती त्यात दिवसभर परिसरात तणावाचे वातावरण होतं आज या प्रकरणात आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे

24 Jun 2024, 08:57 वाजता

Breaking News LIVE: नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं अकोट तालुक्यात गावकऱ्यांपुढं अडचण 

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पठार नदीवरील पर्यायी रस्ता पाण्यात गेला आहे आज सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांना या मार्गावरून ये - जा करण कठीण झालं आहे. पठार नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने पनोरी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. गावातून आपल्या शेतीसाठी आणि दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात टाकून लोखंडी रॉड वरून जीवघेणे कसरत करून ये - जा करावं लागत आहे. 

24 Jun 2024, 08:09 वाजता

Breaking News LIVE: मावळातील पवना धरण परिसरात वर्षा विहारासाठी आलेल्या कॉलेज तरुणाचा बुडून मृत्यू

मावळातील पवना धरण परिसरात वर्षा विहारासाठी आलेल्या एका कॉलेज तरुणाचा पवना धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यातील सिम्बॉसियेस कॉलेज येथील काही विद्यार्थी काल रविवारी मावळात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आले होते. त्यापैकी काही तरुण पवना धरणाच्या बँक वॉटर पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दिल्लीचा रहिवासी असलेला अद्वैवता वर्मा हा तरुण पाण्यात बुडाला.

24 Jun 2024, 08:05 वाजता

Breaking News LIVE: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक 

मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. शहर हद्दवाढ आणि सर्किट बेंच प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यातच आज मध्यरात्रीपासून रिक्षा आणि टॅक्सी देखील बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनांसाठी पासिंग विलंब शुल्क आकारणी रद्द करावी यासाठी आज मध्य रात्रीपासून कोल्हापूर रिक्षा टॅक्सी वाहनधारक समितीतर्फे देखील आंदोलन छेडण्यात आले आहे. उद्या गनिमी काव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. 

24 Jun 2024, 08:02 वाजता

Breaking News LIVE: मावळतील इंदोरी जवळील नाणोली गावाच्या शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

मावळतील इंदोरी जवळील नाणोली गावाच्या शिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. नाणोली मधील प्रतीक भोसले हे शेतीमधील रस्त्याने जात असताना बिबट्या त्याच्या मोबाईलच्या कॅमरात कैद झाला आहे. रस्त्याच्या बाजूला शिकारी साठी दबा देऊन बसलेला बिबट्या प्रतीक भोसले यांना दिसला त्यांनी तात्काळ आपल्या मोबाईल कॅमरात त्याचे चित्रीकरण केले. नाणोली प्रमाणे मावळ तालुक्यातील कामशेत,नायगाव, अहिरवडे या गावातील कुत्री देखील कमी झाल्याचा समोर आला आहे त्यामुळे ह्याभागात देखिल बिबट्याच वास्तव असल्याचं समोर आला आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे यांनी नागरीकांना आव्हान केले आहे की रात्रीच्या वेळी ऐकटे फिरु नये, अन्नाच्या शोधात बिबट्या बाहेर पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

24 Jun 2024, 07:35 वाजता

Breaking News LIVE: मुंबईतील ब्रिटीशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद 

मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन 131 वर्षे जुना बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. पुढील 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल. या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

24 Jun 2024, 07:19 वाजता

Breaking News LIVE: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे. वांद्रे मधील MIG क्लब इथे सकाळी 10 वाजता मनसेची बैठक होणार आहे. राज्यभरातील मनसेचे प्रमुख नेते, सरचिटणीस, तसंच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.