Breaking News LIVE: आजपासून अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होत असून, या पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेचं कामकाज सुरू होणार आहे. याशिवायही देशात आणि राज्यात विविध घडामोडीसुद्धा सुरु असणार असून, या सर्व अपडेट्स एका क्लिकवर पाहता येणार आहेत.
24 Jun 2024, 22:01 वाजता
अभिनेत्री खासदार कंगना राणावतची अजब मागणी, महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूटच मागितला.इतर रूम छोट्या असल्याने थेट CM सुटची मागणी. सदनातूनच राज्यातील एका बड्या नेत्याला कंगनाचा फोन.सूट देता येत नाही,MH सदनचे स्पष्टीकरण.
24 Jun 2024, 20:42 वाजता
पुणे कल्याणी नगर हिट ॲंड रन प्रकरणातील मृत तरुण-तरुणींच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट.
आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही कायदेशीर पावलं उचलावी लागल्यास राज्य सरकार तेही करणार, असे ते यावेळी म्हणाले. अपवादात्मक परीस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन्ही कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहीती.
24 Jun 2024, 20:11 वाजता
इथेनॉल निर्मिती आणि विक्री परवाना रद्द केल्याने 130 कोटीच्या दरम्यान साखर कारखान्याचे नुकसान होण्याचा अंदाज.दुपारी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के पी पाटील यांनी पत्रकार बैठक घेतल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून इथेनॉल निर्मिती प्रकल्प रद्द.
24 Jun 2024, 19:25 वाजता
नीट पेपर फूटी प्रकरणी अटकेत असलेल्या जलील पठाण याला पोलिसांनी केले कोर्टात हजर केले या प्रकरणी आता २ तारखेपर्यंत आरोपी जलील पटान यांना पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
24 Jun 2024, 19:10 वाजता
पुणे पुण्यातील एल थ्री या पबवर पतित पावन संघटनेने दगडफेक केलेली पब चे बॅनर फोर्डिंग फोटले आहे 10 ते12 जणांनी तोडफोड केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत.
24 Jun 2024, 18:37 वाजता
पुण्यातल्या ड्रग्जचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये टॉयलेटमध्ये ड्रग घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
24 Jun 2024, 18:02 वाजता
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी देणार शरद पवार यांची माहिती. सोडून गेलेल्या आमदारच्या जागी नवीन चेहरा देणार. शरद पवार गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी बाबत पक्षात सकारात्मक वातावरण. शरद पवार गटाला मिळणाऱ्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
24 Jun 2024, 17:41 वाजता
पुणे L3 बार प्रकरणी आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 8 आरोपींना 29 जून पर्यंत कोठडी. सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
24 Jun 2024, 16:39 वाजता
Breaking News Live : पुण्यात पबच्या वॉशरूममध्ये अमली पदार्थांचं सेवन
पुण्यातील एका पबच्या वॉशरूममध्ये तरुण अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने पुणे उडता पुणे झाले की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. नियमांचं उल्लंघन करत दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालणारे पब्ज आणि बार... व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईचा धांगडधिंगा आणि त्याही पलीकडे जाऊन पुणे शहराला पडलेला अमली पदार्थांचा विळखा. विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज बदलतेय.
24 Jun 2024, 15:15 वाजता
Breaking News Live : ...म्हणून अजित पवारांना भेटलो; नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं
मी आमदार पण आहे. विधानसभेत आम्ही ज्या मागण्या केल्या आसतात. आणि आमच्या मतदार संघातील निधी बाबत जे आश्वासन दिलेले आसते त्या अनुषंगाने ही भेट होती