Chandrayaan 3 Moon Landing Live Updates: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं चांद्रयान 3 (Chandrayaan 3) आता चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनतीनं हाती घेतलेली ही मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली असून, हा टप्पा आव्हानात्मक असला तरीही तो अशक्य नाही, असा विश्वास इस्रोप्रमुखांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बुधवारची संध्याकाळ किंबहुना 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतासाठी आणि संपूर्ण अंतराळ क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या (ISRO Moon Mission) निमित्तानं पृथ्वीवरील पहिलाच कृत्रिम उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची किमया घडणार आहे. अधिकृत माहितीनुसार चांद्रयानातील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर मॉड्युल बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठावर पोहोचतील. चंद्रावरील ही लँडींग यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि पूर्व सोवियत संघामागोमाग भारत हे काम करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. अशा या चांद्रयानाच्या लँडिंग प्रक्रियेतील सर्व अपडेट्स आणि देशभरातील उत्साहाचं वातावरण एका क्लिकवर...
23 Aug 2023, 07:19 वाजता
Chandrayaan 3 Landing Live Updates: देशविदेशातून प्रार्थना सुरु...
अमेरिकेतील न्यू जर्सी येथे चांद्रयानाच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगसाठी एका पुजेचं आयोजन करण्यात आलं. मोन्रो येथील ओम श्री साई बालाजी मंदिराच्या वतीनं ही पूजा संपन्न झाली.
#WATCH | US: Prayers being offered at Om Sri Sai Balaji Temple and Cultural Center in Monroe, New Jersey for the successful landing of #Chandrayaan3Mission
Members of the Indian-American community say, "It's a proud moment for all of our Indian community. Hopefully, everything… pic.twitter.com/clSH4HBqv8
— ANI (@ANI) August 23, 2023
23 Aug 2023, 07:04 वाजता
Chandrayaan 3 Landing Live Updates: प्रत्येक घडामोडीकडे देशाचं लक्ष...
चांद्रयान 3 च्या यशस्वी लॅंडिंगकडे सा-या देशाचं लक्ष लागलंय. वाराणसीच्या सुदामा कुटी आश्रमात होमहवन करत चांद्रयानच्या यशासाठी प्रार्थना केली... सांधूसंत हातात तिरंगा आणि चांद्रयानाचा फोटो घेऊन यशस्वी लॅंडिंगसाठी महादेवाला साकडं घातलंय...
23 Aug 2023, 07:03 वाजता
Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानाच्या लँडिंगसाठी केंद्रीय मंत्री रामदास यांची कविता...
भारत देशाचे सर्व सायंटिस्ट आहे आमची जान, म्हणूनच चंद्रावर पोहोचणार आहे चंद्रयान
आम्हाला आहे सर्व गोष्टींचे भान म्हणूनच नरेंद्र मोदींनी पाठविले आहेत चंद्रावर चंद्रयान.
23 Aug 2023, 06:58 वाजता
Chandrayaan 3 Landing Live Updates: कशी असेल लँडिंग प्रक्रिया?
चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरल्यानंतर तो अधिक सक्रिय होईल. त्याचे रॅम्प उघडून त्यातून प्रग्यान रोव्हर चंद्रावर उतरेल. त्यानंतर विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर एकमेकांचे फोटो काढून पृथ्वीकडे पाठवतील. चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 25 किमीवर आहे. ताशी 6 हजार किमी वेगावरून त्याचा वेग शून्यावर आणला जाईल. इस्रोकडून आता वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. भारताच्या या कामगिरीकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. चांद्रयान 3 मधील सर्व यंत्रणा व्यवस्थात सुरू असल्याबद्दल इस्रोकडून वारंवार तपासणी केली जात आहे. लँडींगमध्ये काही अडचण जाणवल्यास आजच्या ऐवजी 27 ऑगस्टला लँडिंगचा पर्यायही इस्रोने ठेवला आहे.
23 Aug 2023, 06:54 वाजता
Chandrayaan 3 Landing Live Updates: देशभरात चांद्रयान 3 लँडिंगचा उत्साह पाहायला मिळत असून, देशातील नागरिक शक्य त्या सर्व परिंनी या ऐकिहासिक दिवसाचा सोहळा करताना दिसत आहेत.
ALL THE BEST #Chandrayan3
My students created a sand art on #Chandrayaan 3 with the message "Jai Ho @isro , at Puri beach in Odisha. pic.twitter.com/SDbL8kpbEt— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) August 22, 2023