Chandrayaan 3 Landing LIVE: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग; भारताने इतिहास घडवला

Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानाचा प्रवास तेव्हापासून आतापर्यंत... असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षा थेट चंद्रापर्यंत नेणारं किमयागार चांद्रयान 3 आता निर्धारित स्थळी पोहोचणार आहे.   

Chandrayaan 3 Landing LIVE: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर  चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग; भारताने इतिहास घडवला

Chandrayaan 3 Moon Landing Live Updates: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं चांद्रयान 3 (Chandrayaan 3) आता चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनतीनं हाती घेतलेली ही मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली असून, हा टप्पा आव्हानात्मक असला तरीही तो अशक्य नाही, असा विश्वास इस्रोप्रमुखांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बुधवारची संध्याकाळ किंबहुना 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतासाठी आणि संपूर्ण अंतराळ क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. 

इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या (ISRO Moon Mission) निमित्तानं पृथ्वीवरील पहिलाच कृत्रिम उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची किमया घडणार आहे. अधिकृत माहितीनुसार चांद्रयानातील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर मॉड्युल बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठावर पोहोचतील. चंद्रावरील ही लँडींग यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि पूर्व सोवियत संघामागोमाग भारत हे काम करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. अशा या चांद्रयानाच्या लँडिंग प्रक्रियेतील सर्व अपडेट्स आणि देशभरातील उत्साहाचं वातावरण एका क्लिकवर... 

23 Aug 2023, 12:32 वाजता

Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानाच्या लँडिंगसाठीची जागा कशी निवडली? 

चंद्रावर लँडिंग करताना जागेची निवड कशी होते, हे तुम्हाला माहिती आहे का? इस्रो स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरचे वैज्ञानिक (Isro-Space Applications Centre) आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (Isro-Space Applications Centre) याबाबत नुकताच खुलासा केला आहे. चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी जागेची निवड करताना आधीच्या चांद्र मोहिमेचा डेटा आणि माहितींचा आधार घेतला जातो. म्हणजेच चांद्रयान 3 च्या लँडिंगची जागा निवडताना चांद्रयान 1, चांद्रयान 2, सेलेन, अमेरिकेच्या नेतृत्वातील लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) मोहीम यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

 

23 Aug 2023, 12:06 वाजता

Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानाचं लँडिंग आज झालं नाही तर? 

इस्रोनं पाठवलेल्या चांद्रयान 3 चं लँडिंग आज झालं नाही, तर त्याऐवजी तीन विविध मार्गांचा विविध परिस्थिती अनुसरून अवलंब केला जाईल. चंद्रावरील सूर्योदय, 24 ऑगस्टला तातडीनं लँडिंगसाठीचा दुसरा प्रयत्न आणि आहे त्याच ठिकाणी घिरट्या घालत राहणं असे पर्याय यावेळी उपलब्ध असतील. 

 

23 Aug 2023, 11:35 वाजता

Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयान 3 लँडिंगसाठी लागणारा वेळ 

चांद्रयानाची लँडिंग होण्याआधी इस्रोप्रमुखांनी अचिषय महत्त्वाची माहिती देत आतापर्यंततरी ठरलेल्या वेळेतच लँडिंगची प्रक्रिया पार पडणार असल्याचं सांगितलं. चांद्रयान 3 च्या लँडिंगसाठी साधारण अर्ध्या तासाचा म्हणजेच 30 मिनिटांचा कालावधी लागेल असंही ते म्हणाले. जिथं योग्य जागा निवडून तिथं हे लँडिंग केलं जाणार आहे. 

 

23 Aug 2023, 10:36 वाजता

Chandrayaan 3 Landing Live Updates: तज्ज्ञांचं काय मत? 

चांद्रयान 3 च्या लँडिंगपूर्वी तज्ज्ञ मंडळींनी त्याबाबतचे आपले तर्कवितर्क वर्तवले आहेत. जाणून घ्या ते म्हणालेत तरी काय? 

23 Aug 2023, 09:12 वाजता

Chandrayaan 3 Landing Live Updates: अप्रतिम नृत्याविष्कार 

नागपूरमध्ये भरतनाट्यम नृत्यांगना पूजा हिरवडे हिनं चांद्रयान 3 लँडिंगच्या  निमित्तानं एक नृत्याविष्कार सादर केला. तिच्या नृत्याचा हा सुरेख व्हिडीओ. 

23 Aug 2023, 08:16 वाजता

Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानासाठीच सर्वकाही...

देशाच्या कानाकोपऱ्यातून सध्या चांद्रयानाच्या लँडिंगसाठी प्रार्थना केल्या जात असून, सर्वच नागरिक शक्य त्या सर्व परिंनी चांद्रयानाच्या यशाचीच मनोकामना करत आहेत. वाराणासीमध्येही साधुसंतांनी चांद्रयाच्या सॉफ्ट लँडिंगसाठी यज्ञ केल्याचं पाहाला मिळालं. 

23 Aug 2023, 08:14 वाजता

Chandrayaan 3 Landing Live Updates: लहरा दो.... 

चांद्रयान 3 च्या लँडिंगपूर्वी लडाखमध्ये काही तरुण आणि परदेशी नागरिकांनी हाती तिरंगा घेत या मोहिमेसाठी सुरेल शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. 

23 Aug 2023, 07:27 वाजता

Chandrayaan 3 Landing Live Updates: जळीस्थळी काष्ठीपाषाणी चांद्रयान 3 

University Grants Commission (UGC) कडून सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये चांद्रयानाच्या लँडिंग प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण दाखवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी या लँडिंगचं स्क्रीनिंग होणार आहे. त्यामुळं देशभरात सध्या जळीस्थळी काष्ठीपाषाणी चांद्रयान 3 चीच चर्चा पाहायला मिळत आहे.