Chandrayaan 3 Landing LIVE: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग; भारताने इतिहास घडवला

Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानाचा प्रवास तेव्हापासून आतापर्यंत... असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षा थेट चंद्रापर्यंत नेणारं किमयागार चांद्रयान 3 आता निर्धारित स्थळी पोहोचणार आहे.   

Chandrayaan 3 Landing LIVE: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर  चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग; भारताने इतिहास घडवला

Chandrayaan 3 Moon Landing Live Updates: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं चांद्रयान 3 (Chandrayaan 3) आता चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनतीनं हाती घेतलेली ही मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली असून, हा टप्पा आव्हानात्मक असला तरीही तो अशक्य नाही, असा विश्वास इस्रोप्रमुखांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बुधवारची संध्याकाळ किंबहुना 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतासाठी आणि संपूर्ण अंतराळ क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. 

इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या (ISRO Moon Mission) निमित्तानं पृथ्वीवरील पहिलाच कृत्रिम उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची किमया घडणार आहे. अधिकृत माहितीनुसार चांद्रयानातील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर मॉड्युल बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठावर पोहोचतील. चंद्रावरील ही लँडींग यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि पूर्व सोवियत संघामागोमाग भारत हे काम करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. अशा या चांद्रयानाच्या लँडिंग प्रक्रियेतील सर्व अपडेट्स आणि देशभरातील उत्साहाचं वातावरण एका क्लिकवर... 

23 Aug 2023, 17:54 वाजता

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर  चांद्रयाना 3 चे यशस्वी लँडिंग;  NASA ला जमलं नाही ते ISRO नं करून दाखवलं!

23 Aug 2023, 17:34 वाजता

Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयान 3 च्या लँडर मॉड्यूले 21 पृथ्वी 120 वेळा चंद्राला प्रदक्षिणा घातल्या आहेत.  इस्त्रोची टीम लँडिंगसाठी सज्ज

23 Aug 2023, 13:03 वाजता

Chandrayaan 3 Landing Live Updates: इस्रोच्या ऑफिसमधून थेट तुमच्यापर्यंत... 

चांद्रयान 3 लँडिंगपूर्वी इस्रोच्या कार्यालयात नेमकी काय परिस्थिती आहे, हे इस्रोनंत सोशल मीडियाच्या माध्यमावरून सांगण्यात आलं. 'आम्ही तयार आहोत' असं म्हणत त्यांनी लँडिंग प्रक्रियेची माहिती दिली.