भारत-इंग्लंड 23 वेळा आमने सामने, कोणाचं पारडं जड...पाहा हेड-टू-हेट रेकॉर्ड

T20 World Cup IND vs ENG Semi Final: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता रंगतदार झआली आहे. दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, भारत आणि इंग्लंडने सेमीफायनमध्ये प्रवेश केलाय. भारत आणि इंग्लंडदरम्यान सेमीफायनलचा दुसरा सामना रंगणार आह.

Updated: Jun 26, 2024, 05:58 PM IST
भारत-इंग्लंड 23 वेळा आमने सामने, कोणाचं पारडं जड...पाहा  हेड-टू-हेट रेकॉर्ड title=

T20 World Cup IND vs ENG Semi Final : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 27 जून म्हणजे गुरुवारी सेमीफायनलच्या (T20 World Cup) लढती रंगणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमने सामने असणार आहेत. हा सामना सकाळी 5.30 वाजता खेळला जाणार आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी (India vs England) होणार आहे. गयानामध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गयानामध्ये पावसाचा अंदाज असून दुसऱ्या सेमीफायनलसाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही.

भारत-इंग्लंड किती वेळा आमने सामने
भारत आणि इंग्लंडदरम्यान हेड टू हेडचा (Head-2-Head) विचार केला तर दोघांची कामगिरी जवळपास सारखी आहे. टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारत आणि इंग्लंडदरम्यान सेमीफायनलचा सामना रंगला होता. हा सामना एकतर्फी झाला. जोस बटलर आणि एलेक्स हेल्सने टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगीच धुलाई केली होती. दोघांनी तुफानी अर्धशतक करत टीम इंडियाचा तब्बल 10 विकेटने पराभव केला होता. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड आतापर्यंत 4 वेळा आमने सामने आले आहेत. यात भारत आणि इंग्लंडने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. 

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंड आतापर्यंत 23 सामन्यात आमने सामने आलेत. यातल्या 12 सामन्यात भारताने विजय मिळवलाय. तर इंग्लंडने 11 सामन्यात बाजी मारली आहे. आता टी20 वर्ल्ड कप 2024 चा सेमीफायनल सामन्यात बाजी मारत कोणता संघ आकडेवारी वाढवणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हन बदलणार?
टी20 वर्ल्ड कप 2022 मधल्या टीम इंडिया आणि टी20 वर्ल्ड कप 2024 च्या टीम इंडियात आतापर्यंत चार बदल झाले आहेत. त्यावेळच्या टीम इंडियात केएल राहुल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि आर अश्विनचा समावेश होता तर यावेळच्या टीम इंडियात शिवम दुबे, मोहम्मद सिराज, यशस्वी जायस्वाल आणि संजू सॅमसनचा समावेश आहे. 

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार),  व‍िराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, हार्द‍िक पांड्या, मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू - खलील अहमद, रिंकू सिंग