Live Blog: लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा? झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा? झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चे विश्लेषण

Live Blog: लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा? झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चे विश्लेषण

Exit Poll Results Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. काल अनेक संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. दरम्यान झी न्यूजकडून एआय अॅंकर झिनीया लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अॅंकर ठरणार आहे.

( DISCLAIMER- 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, ZEE २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.)

2 Jun 2024, 20:46 वाजता

महाराष्ट्रातही एनडीएला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  एनडीएची टॅली 41 वरुन 26 ते 34 च्या दरम्यान घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, इंडिया आघाडीची टॅली 5 वरुन 15 ते 21 वर जाण्याची शक्यता आहे. 

2 Jun 2024, 19:21 वाजता

दिल्लीतही इंडिया आघाडी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळतील असा अदांज आहे.  गेल्यावेळी इंडिया आघाडीला एकही जागा मिळाली नव्हती. भाजपच्या जागा 7 वरुन 2 ते 4 दरम्यान घटण्याची शक्यता आहे. 

2 Jun 2024, 19:13 वाजता

राजस्थानमध्येही एनडीएला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीच्या जागा 26 वरुन 15 ते 16 च्या दरम्यान घसरण्याची शक्यता आहे. तर, इंडिया आघाडीच्या जागा ० वरुन 6 ते 10 जागांवर जाण्याची शक्यता आहे. 

2 Jun 2024, 19:11 वाजता

मध्य प्रदेशात एनडीच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनडीएची टॅली 28 वरुन 16 ते 22 वर घसरण्याची शक्यता आहे. तर इंडियाची टॅली १ वरुन ८ ते १२ च्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. 

2 Jun 2024, 18:47 वाजता

पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस वेगवेगळे लढण्याचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  इंडिया आघाडील 3 ते 5, एनडीएला 5 ते 7 तर इतरांना 2 ते 4 जागांचा अंदाज वर्तवला जात आहे.  गेल्यावेळी काँग्रेसला 8 तर एनडीएला 4 जागा मिळाल्या होत्या.

2 Jun 2024, 18:43 वाजता

उत्तर प्रदेशात एनडीएला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  एनडीएच्या जवळपास 8 ते 12 जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  2019 मध्ये एनडीएला 64 जागा मिळाल्या होत्या.  एक्झीट पोलमध्ये 52 ते 58 जगांचा अंदाज वर्तवला जात आहे. 

2 Jun 2024, 18:26 वाजता

एनडीएच्या जागा घटणार मात्र मोदी सरकारच येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तरेकडील राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, या राज्यात एनडीएच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

2 Jun 2024, 18:10 वाजता

Zee News AI Exit Poll 2024 : 'एक्झिट पोल नक्की किती खरं आहे यावर मला शंका आहे. कारण भारतातील मतदाता आपण कोणाला मत दिलं याबद्दल किती खरं बोलतात हे कसं ठरवणार.' असा प्रश्न राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी उपस्थितीत केलाय. 

2 Jun 2024, 18:00 वाजता

Zee News AI Exit Poll 2024 : 'शनिवारी आलेल्या एक्झिट पोलवर जर विश्वास ठेवला तर दक्षिणेकडील बदल होणार हे दिसून येत आहे. त्याशिवाय या बदलमागील कारणं पाहावे लागणार आहेत.', असं मत राजकीय अभ्यासक प्रकाश पवार यांनी झीच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त केलंय.  

2 Jun 2024, 17:45 वाजता

Republic Bharat-MATRIZE Exit Poll: दिल्लीत कोणाची सत्ता?

रिपब्लिक भारत-मॅटराइजच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत NDA ला 5 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.तर इंडिया आघाडीला 0-2 जागा मिळू शकतील.