Independence Day LIVE: आज देश 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. त्यानंतर केलेल्या 90 मिनिटांच्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एवढेच नाही तर पुढील 5 वर्षात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून पुन्हा देशाला संबोधित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केली. मणिपूरमधील हिंसाचाराचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी तेथे शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. भ्रष्टाचार, कुटुंबवाद आणि तुष्टीकरणमुक्त भारत करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले..
15 Aug 2023, 07:38 वाजता
Independence Day LIVE: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात
"स्वातंत्र्याच्या या महान पवित्र सणाच्या निमित्ताने भारताबद्दल अभिमान आणि आदर असलेल्या करोडो लोकांना मी शुभेच्छा देतो. असहकाराचे आंदोलन, माझ्या प्रिय कुटुंबातील पूज्य बापूंच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाची चळवळ आणि भगतसिंग, राजगुरू यांसारख्या अगणित वीरांचे बलिदान. त्या पिढीत क्वचितच असा कोणी असेल ज्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले नसेल. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी योगदान दिले, त्याग केले आणि तपश्चर्या केली. त्या सर्वांना मी आदरपूर्वक नमन करतो," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
15 Aug 2023, 07:30 वाजता
Independence Day LIVE: पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले
लाल किल्ल्याच्या तटबंदीसमोर पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट उपस्थित आहेत. पंतप्रधानांचा ताफा लाल किल्ल्यावर पोहोचला आहे.
15 Aug 2023, 07:17 वाजता
Independence Day LIVE: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री लाल किल्ल्यात दाखल
#WATCH | Union Home Minister Amit Shah along with other ministers at Red Fort to attend Independence Day celebrations pic.twitter.com/Sc3Luf1YNr
— ANI (@ANI) August 15, 2023
15 Aug 2023, 07:14 वाजता
Independence Day LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्या
तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा. या, या ऐतिहासिक प्रसंगी अमृतकलमध्ये विकसित भारताचा संकल्प दृढ करूया. जय हिंद!, असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.
आप सभी को स्वतंत्रता दिवस की अनेकानेक शुभकामनाएं। आइए, इस ऐतिहासिक अवसर पर अमृतकाल में विकसित भारत के संकल्प को और सशक्त बनाएं। जय हिंद!
Best wishes on Independence Day. We pay homage to our great freedom fighters and reaffirm our commitment to fulfilling their vision. Jai Hind!
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2023
15 Aug 2023, 07:13 वाजता
Independence Day LIVE: लाल किल्ल्याजवळ कडक सुरक्षा व्यवस्था
77 वा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लाल किल्ल्याभोवती 10,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच 1000 कॅमेरे, ड्रोनविरोधी यंत्रणाही बसवण्यात आली आहे.
15 Aug 2023, 07:12 वाजता
Independence Day LIVE: प्रत्येक घरात तिरंगा लावण्याचे आवाहन
13 ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 'हर घर तिरंगा अभियान'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केले आहे. त्यांनी लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपीच्या जागी तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे. तिरंग्याशी प्रत्येक भारतीयाचे भावनिक नाते आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.