पंजाबमध्ये काँग्रेस हरली तर मी राजीनामा देईन- कॅप्टन अमरिंदर सिंह

काँग्रेस उमेदवाराच्या विजय किंवा पराभवाला काँग्रेसचे मंत्री आणि आमदार जबाबदार असतील असे हायकमांडने ठरवले आहे. 

Updated: May 17, 2019, 08:56 AM IST
पंजाबमध्ये काँग्रेस हरली तर मी राजीनामा देईन- कॅप्टन अमरिंदर सिंह  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसने चांगले प्रदर्शन केले नाही तर त्याची सर्व जबाबदारी माझी असेल आणि मी पदाचा राजीनामा देईन असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केले. न्यूज एजंसी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. लोकसभा निवडणूकीच्या राज्यातील निकालात काँग्रेसचा सुपडा साफ झाला तर मी याची पूर्ण जबाबदारी घेत राजीनामा देईन असे ते म्हणाले. राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार निवडणुकीच्या निकालासाठी जबाबदार असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेस उमेदवाराच्या विजय किंवा पराभवाला काँग्रेसचे मंत्री आणि आमदार जबाबदार असतील असे हायकमांडने ठरवले आहे. मी देखील ही जबाबदारी घेण्यास तयार आहे. पण मला पंजाबमध्ये काँग्रेसला सर्व जागा मिळतील हा मला विश्वास आहे असेही अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये 19 मेला मतदान होणार आहे. 

शिरोमणि अकाल दल(बादल) आणि भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने एक दशक पंजाबचे नेतृत्व केले. त्यानंतर 2017 साली काँग्रेसला राज्यात विजय मिळाला. यानंतर अमरिंदर सिंह पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनले.