मैनपुरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील मागास वर्गाबद्दल वाटत असलेली काळजी ही खोटी आहे. निवडणुका असल्यामुळे त्यांना मागासलेल्या जातींचा पुळका आला आहे, असे वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी केले. त्या शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या मैनपुरी मतदारसंघातील प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी मुलायम सिंह हेच मागासलेल्या जातींचे खरे कैवारी असल्याचे सांगितले. मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या झेंड्याखाली सर्व जातीच्या लोकांना एकत्र आणले, याबाबत कोणतेही दुमत नाही. मुलायम सिंह हे नरेंद्र मोदींसारखे खोटे मागासवर्गीय नाहीत. मुलायम सिंह हेच खरे मागासवर्गीय आहेत. त्यांचा जन्म या समाजात झाला आहे. त्यामुळे मैनपुरी मतदारसंघातून मुलायम सिंह यांना निवडून द्या, असे आवाहन मायावती यांनी मतदारांना केले.
Mayawati in Mainpuri: Isme koi sandeh nahi hai ki inhone (Mulayam) SP ke banner ke tale UP mein sabhi samaj ke logon ko apni party mein joda hai. Ye PM Modi ki tarah nakli veh farzi pichde varg ke nahi hain, Mulayam ji asli hain. janam-jaat pichde varg ke hain. pic.twitter.com/6bv3DDesdY
— ANI UP (@ANINewsUP) April 19, 2019
Mulayam Singh Yadav in Mainpuri: Aaj Mayawati ji ayi hain, unka hum swagat karte hain, aadar karte hain. Mayawati ji ka bahot samman karna hamesha, kyun ki samay jab bhi aya hai to Maywati ji ne hamara sath diya hai. Hume khushi hai ki hamare samarthan ke liye wo ayi hain. pic.twitter.com/PqcPnd1wD0
— ANI UP (@ANINewsUP) April 19, 2019
Mayawati in Mainpuri: Desh veh aam jan-hith mein aur party ke movement ke hith mein bhi, kabhi-kabhi humen kathin faisle lene padte hain jisko aage rakh kar hi humne desh ke vartmann haalaton ke chalte hue, UP mein SP ke sath gathbandhan kar ke chunaav ladne ka faisla kiya hai. https://t.co/UfPj6ImnNF
— ANI UP (@ANINewsUP) April 19, 2019
तर मुलायम सिंह यांनीही आपल्या भाषणात मायावती यांचे कौतुक केले. मी नेहमीच मायावती यांचा सन्मान केला आहे. कारण प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांनी आमची साथ दिली आहे. आज त्या माझ्या समर्थनासाठी मैनपुरीत आल्या याबद्दलही मला आनंद वाटत असल्याचे मुलायम सिंह यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच अकलूज येथे झालेल्या सभेत आपण खालच्या जातीचे असल्यामुळे मला विरोध होत असल्याचे म्हटले होते. आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मला याचा अनुभव आला आहे, असेही मोदींनी प्रचारसभेत म्हटले होते.
लोकशाहीत राजनेता सर्वेसर्वा बनलाय. किमान तसं मानलं जातं आहे. राजकारणी तर तसं मानतात. पण, आपणही तसं समजून चाललो आहोत हाच चिंतेचा विषय आहे. स रोहित, शिवसेना आमदाराची बातमी..... शिवसेना आमदारावर तलवारीने हल्ला... आणि एफबीला धनुष्यबाणाचा फोटो टाकला असता, तर आणखी चालली असती... फ्लॅट बातम्या टाकणे टाळ ओके https://zeenews.india.com/marathi/india/imd-expects-monsoons-to-be-near-...