नवी दिल्ली : लोकसभा सत्र सुरू असताना बऱ्याचदा सदस्यांकडून गोंधळ घातला जातो. तसेच वेल मध्ये गदारोळ केला जातो. पण आता यापुढे अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. लोकसभा नियम (रूल्स) कमिटीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार जागेवर उभे राहून गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर वेल मध्ये जाऊन गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई देखील होईल असेही सांगण्यात येत आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सदस्य लोक लेखा समिती (पीएसी) प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी यावरील निर्णय पुढच्या लोकसभेत घेण्यासाठी पत्र लिहिले होते. पण लोकसभा नियम समितीने ते फेटाळून हा निर्णय घेतला आहे.