दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा

 दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा होणार आहे. 

Updated: Mar 11, 2020, 07:53 AM IST
 दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा

नवी दिल्ली : दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा होणार आहे. नियम १९३ नुसार ही चर्चा होणार असल्याने त्यावर मतदान होणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या चर्चेला उत्तर देणार आहेत. 

काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी गेल्या आठवड्यात दिल्ली दंगलीवर चर्चेची मागणी लावून धरली होती. यासाठी त्यांनी संसदेच्या दोन्ही संभागृहांमध्ये गोंधळ घातला होता. त्यामुळे संसदेचं कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले होते. 

दिल्ली दंगलीच्या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांना गेल्या आठवड्यात निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी आणि भाजपचे दिल्लीतील खासदार या चर्चेला सुरुवात करतील.

0