नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारावरून भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दोन्ही पक्षांनी गेल्या 70 वर्षात केवळ भ्रष्टाचारच केला आणि ही स्थिती बदलण्यासाठी आम आदमी पार्टी बनवावी लागली. ज्यावर जनतेने विश्वास दाखवला आणि बहुमत दिले. मंगळवारी उत्तर पश्चिम मतदार संघात जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या 70 वर्षात काँग्रेसने आपली घरे भरण्या व्यतिरिक्त कोणते काम केले नाही. तर चार वर्षात मोदी सरकारने आमच्या कामात अडवणूक करण्या व्यतिरिक्त कोणते काम केले नाही. यामुळे जनतेचे नुकसान झाल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.
ही स्थिती बदलण्यासाठी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणे हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत त्यांनी आप उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. मला लोक विचारतात शिलाजी कशा सरकार चालवतात ? मी त्यांना उत्तर देतो की, त्यांच्याप्रमाणे आपणही सरकार चालवू शकलो असतो मग आपल्याला आम आदमी पार्टी बनवण्याची गरज का पडली असती ? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला.
जिन्होंने घर बनाया उन्ही बुजर्गो को घर से निकाल दिया? जो अपने बुजर्गो का नही हो सकता वो किसका होगा? क्या यही भारतीय सभ्यता है? हिन्दू संस्क्रति तो ये नही कहती कि बुजर्गों को बेज्जत करो
देश के लोगो मे चर्चा है कि मोदी जी आडवाणी जोशी और सुषमा की बेज्जती क्यो कर रहे है? https://t.co/bcU1uZbK69
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 26, 2019
शिला दिक्षीत यांच्या कार्यकाळात शाळा, हॉस्पीटल आणि रस्त्यांसहीत सर्व नागरी सुविधा वाऱ्यावर असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. सरकारला जनहिताचे काम करायचे आहे म्हणून आमच्या कामात अडथळे आणले जात असल्याचे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी तीन लोकसभा क्षेत्रातील पार्टी उमेदवारांसाठी प्रचार करत जनतेला संबोधित केले. रोहिणी मतदारसंघाव्यतिरिक्त नवी दिल्ली लोकसभा क्षेत्र मोती नगर आणि चांदनी चौकमधील त्रिनगरमध्ये जाऊन प्रचार केला. पूर्ण राज्याच्या मागणीसाठी उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले.