सावधान! सैराटसारखे पळून गेले पण झालं काही वेगळंच...

उत्तरप्रदेश फतेहगंजमध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमी युगलांनी घरातून पळून जावून लग्न केले.

Updated: Jul 31, 2019, 03:44 PM IST
सावधान! सैराटसारखे पळून गेले पण झालं काही वेगळंच...

फतेहगंज : उत्तरप्रदेश फतेहगंजमध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमी युगलांनी घरातून पळून जावून लग्न केले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीने पत्नीला धावत्या ट्रेनमधून फेकले. मात्र या घटनेतून ती महिला बचावली.  

या महिलेचे नाव बेबी असं आहे. तिने तिच्यासोबत घडलेली घटना पोलिसांना सांगितली. बेबीने सांगितले की, ट्रेनमधून तिला बाहेर फेकले गेले. त्यानंतर लगेच तिच्या नवऱ्याने सुद्धा  धावत्या ट्रेनमधून उडी मारली. बेबी आणि तिच्या पती हे फतेहगंजच्या (पश्चिम) पोलीस स्टेशन हद्दीत, रेल्वे रुळावर बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना सापडले. 

बेबी आसामच्या तीन सुकियामध्ये राहते. तिने सांगितले की, मागील काही दिवसांपूर्वी मला अनोळखी नंबरवरून फोन येत होता. हा नंबर हिरा नावाचा मुलाचा होता, त्यानंतर मी त्याच्याशी बोलणे सुरू केले आणि बघता बघाता मला त्याच्याशी प्रेम झाले. 

त्यानंतर आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्यण घेतला. २६ जुलै या रोजी हिरा तीनसुकियामध्ये आला होता. त्यावेळीत मी त्याच्यासोबत पळून गेली. पहिल्यांदा आम्ही दोघे पाटणामध्ये गेलो. नंतर आम्ही २ दिवस हॉटेमध्ये थांबलो. त्यानंतर आम्ही एका मंदिरात जाऊन विवाह केला. 

त्यानंतर आम्ही मोरदाबाद जाणारी ट्रेन आम्ही पकडली. ट्रेनने बरेली सोडल्यानंतर मला ट्रेनमधून हिराने फेकून दिले. बेबीने सांगितले यावेळी हिरा बोलण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे तो असा का वागला? 

इतके टोकाचे पाऊल त्याने का उचलले ? मी समजू शकले नाही. सध्या रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ही माहिती पोलीस अधिक्षक अभिनंदन सिंह यांनी दिली आहे.