पुन्हा इतक्या रुपयांनी वाढणार एलपीजी सिलिंडर, जाणून घ्या

तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या

Updated: Dec 16, 2020, 03:17 PM IST
पुन्हा इतक्या रुपयांनी वाढणार एलपीजी सिलिंडर, जाणून घ्या title=

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती स्वयंपाक गॅस सिलिंडकची किंमत ५० ने वाढलीय. तसेच ५ किलोच्या छोट्या सिलिंडरची किंमत १८ रुपयांनी वाढलीय. १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत ३६.५० रुपयांनी वाढलीय. 

तेल कंपन्यां दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचे परिक्षण करतात. या महिन्यात १ डिसेंबरमध्ये गॅसच्या किंमतींचे परिक्षण झाल्यानंतर एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली.  कर्मशिअल गॅस सिलिंडर किंमतीत वाढ करण्यात आलीय. प्रत्येक राज्यामध्ये टॅक्स वेगवेगळा असतो. त्याप्रमाणे एलपीजीच्या किमतींमध्ये फरक पडतो. 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये १४.२ किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलिंडर आता ६९४ रुपये झालाय. कोलकातामध्ये हा दर ७२०.५० रुपये तर मुंबईमध्ये ६९४ रुपये आणि चेन्नईमध्ये ७१० रुपये आहे.

१९ किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ झालीय. दिल्लीमध्ये ही किंमत १३३२ रुपये इतकी झालीय. कोलकाता आणि मुंबईमध्ये ही किंमत ५५ रुपयांनी वाढून १३८७.५० आणि १२८०.५० रुपये झालीय. या महिन्याच्या १ डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत देखील वाढ झालीय.