LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त होणार?; पाहा बदललेले दर

LPG Gas Price: आता सगळीकडेच महागाई (Inflation) वाढू लागली आहे. त्यातून सगळ्यांना चिंता आहे ती म्हणजे दरवाढीची. यंदाच्या वर्षी LPG सिलेंडरमध्ये (LPG Cylinder Gas) मोठे बदल पाहायला मिळत आहे. त्यातून आता मार्चपासून नवे दर (March Price Hike) पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 28, 2023, 10:44 AM IST
LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त होणार?; पाहा बदललेले दर title=
LPG Cylinder Price new changes from March 1 in domestic gas read the full article for latest updates news in marathi

Domestic Gas Price: जीवनावश्यक वस्तूंच्या (Price Hike) किमतीही आता गगनाला भिडू लागल्या आहेत. सोनं-चांदी, पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Today) आणि दूध, भाज्या अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस महागाईची (Inflation in India) हुलकावणी देत आहेत. त्यातून घरगुती सिलेंडरच्या (Domestic Gas) किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घरगुती सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमतींमध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे. मार्च महिन्याच्या एक तारखेपासून आता एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले असल्याचे कळते आहे. (LPG Cylinder Price new changes from March 1 in domestic gas read the full article for latest updates news in marathi)

मार्च महिन्यातापासून एलपीजी गॅस सिलेंडर म्हणजे घरगूती गॅस सिलेंडर हा स्वस्त होणार आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर कितीनं स्वस्त (Change in LPG Gas) होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला महागाईनं घेरलं आहे. त्यातून दिवसाला होणारा खर्च हा आपल्या प्रत्येकासाठी एक कळीचा मुद्दा आहे. त्यातून आपल्याला सर्वात जास्त सतावणारा मुद्दा आहे तो म्हणजे गॅस सिलेंडरचा. गॅस सिलेंडरच्या किमती या दिवसेगणिक वाढू लागल्या असताना आता ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. यंदा गृहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी असून यावेळी काहीसा दिलासा आपल्या सगळ्यांना गॅस सिलेंडरमधून मिळणार आहे. 

नवा महिना, नवी सुरूवात - 

नव्या महिन्याची नवी सुरूवात करताना आपल्याला अनेक गोष्टी या लक्षात घ्याव्या लागतात. खासकरून आर्थिक प्रश्नांवरही लक्ष द्यावे लागते. मागच्या महिन्यात जर का जास्त खर्च झाला असेल तर त्यानूसार आपल्याला नव्या महिन्यात खर्चाचे नियोजन (Expenses Mangement) करावे लागते. आपला पगार महिना अखेरीस भरतो परंतु त्यानुसार आपल्याला आपल्या महिन्याभराचे पुढचे प्लॅनिंगही (Financial Planning) करावे लागते. त्यातून आपल्या डोक्यावर अनेक गोष्टींचे ओझेही असते. त्यामुळे आपले विशेष लक्ष द्यावे लागते ते म्हणजे किंमतींवरती. आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागते. आज या वर्षातला फेब्रुवारीचा महिना संपतो आहे त्यातून आता आपल्याला आपल्या पुढील महिन्याचे नियोजनही करणं आवश्यक आहे. 

हेही वाचा - 1 March New Rules: 1 मार्चपासून बदलणार हे नियम! तुमचं महिन्याचं बजेट बिघडण्याची शक्यता

काय आहे नवीन दर? 

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, दिल्लीत एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत (Gas Cylinder Price in Delhi) ही 1053 रूपये इतकी आहे. ही किंमत 14.2 किलो गॅस सिलेंडरची आहे. तर मुंबईत 14.2 किलो एलपीजी गॅस (LPG Gas Price in Mumbai) सिलेंडरची किंमत 1052.50 इतकी आहे. कोलकत्तामध्ये याच सिलेंडरची किंमत ही 1079 रूपये इतकी असून चैन्नईमध्ये 1068.50 इतकी आहे.