LPG Gas Cylinder Rules : सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही गॅस सिलेंडर (Gas Cylinder) वापरत असाल तर जाणून घ्या तुम्ही एका वर्षात किती सिलेंडर घेऊ शकता. त्याचे नवे नियम जारी करण्यात आले आहेत. तुम्ही एका वर्षात किती सिलेंडरसाठी अर्ज करू शकता याबाबत जाणून घ्या.
एक वर्षात घेऊ शकता 15 सिलेंडर
आतापासून ग्राहकांसाठी एलपीजी सिलेंडरची संख्या निश्चित करण्यात आली आहे. आतापासून कोणताही ग्राहक एका वर्षात केवळ 15 सिलेंडर बुक करू शकतो. म्हणजेच आता तुम्ही एका वर्षात 15 पेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही. त्याच वेळी, तुम्ही एका महिन्यात 2 पेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकत नाही.
सिलेंडर घेण्यासाठी नवीन नियम करण्यात आले असून, आतापर्यंत सिलेंडर घेण्यासाठी काही महिने किंवा वर्षांचा कोटा निश्चित करण्यात आला नव्हता. एका वर्षात अनुदानित सिलेंडरची संख्या 12 झाली आहे, जर तुम्ही 15 सिलेंडर घेतले तर तुम्हाला फक्त 12 वर सबसिडी मिळेल.
दरम्यान, IOC नुसार, 1 ऑक्टोबरपासून गॅसच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत, त्यानंतर दिल्लीत सिलेंडरची किंमत 1053 रुपये, मुंबईत 1052.5 रुपये, चेन्नईमध्ये 1068.5 रुपये आणि कोलकातामध्ये 1079 रुपये आहे.