भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद गुजरात आणि मध्य प्रदेशात

महाराष्ट्रातील भीमा गोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद आता शेजारील राज्यांत उमटण्यास सुरुवात झाल्याचं दिसत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 4, 2018, 02:29 PM IST
भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद गुजरात आणि मध्य प्रदेशात title=
Image: ANI

भोपाळ : महाराष्ट्रातील भीमा गोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद आता शेजारील राज्यांत उमटण्यास सुरुवात झाल्याचं दिसत आहे.

गुजरातमधील जूनागढजवळ आंदोलनकर्त्यांनी रास्तारोको करत आंदोलन केलं. तर, मध्यप्रदेशात १२ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंद दरम्यान काही ठिकाणी हिंसक आंदोलनं झालं तर, काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही समोर आलं.

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आता गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये आंदोलन सुरु झालं आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपुर जिल्ह्यात आंदोलकांनी १२ बसेसची तोडफोड केली आहे.

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर बुधवारी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला होता. या दरम्यान शाळा, कॉलेजेस, रिक्षा, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी रास्तारोको आणि रेलरोकोही केला.