Crime News : लग्न असलेल्य घरी जवळपास एक महिन्यापासून तयारी सुरू असते. इतकं सारं करूनही लग्नाच्या दिवशी ऐनवेळी झालेली पळापळ आपण पाहिली असेल किंवा अनुभवलीही असेल. नवरी मुलीहीचंही आधीच सर्व काही फिक्स असतं की, लग्नाच्या दिवशी कोणत्या विधीला कोणती कपडे, ज्वेलरी घालायची. कारण यासाठी तिने खरेदीसाठी खास टाईमिंग काढलेला असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा तिचा मेकअप असतो, जर तोच तिच्या मनासारखा झाला नाही तर काही बोलायलाच नको. मग तिचं कोणत्याही विधीमध्ये लक्ष लागत नाही. अशातच एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये लग्नात नवरी मुलीला तिचा मेकअप आवडला नाही त्यानंतर जे काही घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.
नेमकं काय घडलं?
ही घटना मध्य प्रदेशमधील असून एका मुलीचा 3 डिसेंबरला विवाह होता. वधूच्या घरच्यांनी वधूच्या मेकअपसाठी मोनिका मेकअप स्टुडिओच्या संचालिका मोनिका पाठक यांच्याशी संपर्क साधला होता. ब्युटी पार्लरच्या संचालिका मोनिका पाठक यांनी साडे तीन हजार रूपये फी सांगितली.
ठरल्याप्रमाणे लग्नाच्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबरला स्टुडिओच्या संचालिका मोनिका पाठक यांना फोन केला. वधूला पार्लरमध्ये नेण्यात आलं. त्यावेळी मोनिका तिथे उपस्थित नव्हत्या. पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी तिचा खराब मेकअप केला. संतापलेल्या वधूने मोनिका पाठक यांना फोन करत झालेला सर्व प्रकार सांगितला. मात्र मोनिकाने वधूला जातीवाचक शिवीगाळ केली.
ही माहिती सेन वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना कळताच तेही संतप्त झाले. मंगळवारी वधूसह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले आणि मोनिका पाठक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान, स्टेशन प्रभारी अनिल गुप्ता यांनी सांगितले की वधू आणि सेन समुदायाने दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. याप्रकरणी लवकरच मोनिका पाठकची चौकशी करण्यात येणार आहे.