मुंबई / नवी दिल्ली : देशभरात नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act - CAA) तीव्र विरोध असताना आता भाजप समर्थकांतून रॅली काढण्यात येत आहे. नागपूरमध्ये या कायद्याच्या समर्थनार्थ जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, आसाम, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि गुजरातच्या सततच्या हिंसक आंदोलनाच्या बातम्या येत असताना नागपुरातून CAAच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात रॅली काढली गेली.
नागपुरात आज सीएएच्या समर्थनार्थ लोकाधिकार मंचने रॅली काढली. यशवंत स्टेडियमवरून निघालेल्या रॅलीचा संविधान चौकात समारोप होणार आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस देखील या रॅलीत सहभागी झालेत. मुंबईत देखील सीएएच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आलीय. तर तिकडे दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तिन्ही शहरातल्या रॅलीवर आपली नजर असणार आहे.
रविवारी नागपुरात लोकाधिकार मंचने आरएसएस आणि इतर दलाच्या सीएएच्या समर्थनार्थ रॅली काढली. या रॅलीमध्ये हजारो लोकांनी सभाग घेतला. या रॅलीत मोठ्या प्रमाणात फलक दिसून आलेत. तर दुसरीकडे दिल्ली, मुंबई, उदयपूर, हरिद्वार, बंगळुरु आणि चेन्नई येथे वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी या कारवाईच्या समर्थनार्थ रॅली काढल्या आहेत.
Maharashtra: A rally in support of #CitizenshipAmendmentAct organized in Nagpur by Lok Adhikar Manch,BJP, RSS and other organizations. pic.twitter.com/tleB1fFYy0
— ANI (@ANI) December 22, 2019
दिल्लीचा रामलीला मैदान (रामलीला मैदान) सकाळी ११ वाजता पीएम नरेंद्र मोदी (नरेंद्र मोदी) यांची रॅली सुरु आहे. दिल्लीत कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या रॅलीमध्ये दीड लाख सहभागी होण्याची शक्यताय.
दिल्लीतल्या १ हजार ७३४ अनधिकृत वसाहती एका विधेयकाद्वारे नियमित करण्यात आल्यायत. त्यामुळे जवळपास ४० लाख लोकांना त्यांच्या संपत्तीचा हक्क मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी भाजपनं या रॅलीचं आयोजन केलंय. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि एनआरसीसंदर्भात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दिल्लीच्या निवडणुका जवळ आल्यायत. या रॅलीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल फुंकतील.
पंतप्रधानांच्या रामलीला मैदानातील सभेला दहशतवाद्यांचा धोका आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा, राम जन्मभूमी आणि कलम ३७० हटवल्यामुळं दहशतवाद्यांचं पित्त खवळलंय, त्यामुळे रॅलीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. गुप्तचर यंत्रणेनं दिल्ली पोलिसांना सतर्क केलंय. रामलीला मैदानाकडे जाणाऱ्या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. तसंच रॅलीच्या सुरक्षेसाठी इमारतींवर विशेष सुरक्षारक्षक तैनात असतील.
दरम्यान, नागरिकत्व कायद्याला काँग्रेस देशभरात विरोध करत असताना राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्री असलेले मोहम्मद खान यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या कायद्याचं समर्थन केले आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहर लाल नेहरू आणि काँग्रेसचे वचन पूर्ण केले आहे.