शिवलिंग जे दरवर्षी जागा बदलतं, कुठे आहे? आणि कसं पोहोचाल या ठिकाणी?

शिव मंदिरातील हैराण करणारे किस्से 

Updated: Mar 10, 2021, 01:54 PM IST
शिवलिंग जे दरवर्षी जागा बदलतं, कुठे आहे? आणि कसं पोहोचाल या ठिकाणी? title=

मुंबई : गुरूवारी देशभरात महाविशरात्री (Mahashivratri 2021)  साजरी केली जाईल. भगवान शिव जे भाविक मनोभावे पूजा करतात. महाशिवरात्रीनिमित्त (history about Vaneshwar Temple of Nagaria Mandir ) एका अशा मंदिराची कथा जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला थक्क करेल. महादेवाच्या या मंदिरातील(Shivaling change is place) अशा गोष्टी समोर आल्या आहेत ज्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाहीय 

उत्तर प्रदेशातील मयन ऋषी यांच्या मैनपुरीतील एका गावात छोटंस प्राचीन वाणेश्वर मंदिर आहे. या मंदिराबाबत गावकऱ्यांनी एक अजबच गोष्ट सांगितली आहे. या मंदिरातील शिवलिंग दरवर्षी सरकतं. तेथील स्थानिकांनी सांगितलेली एक धक्कादायक बाब. शास्त्रानुसार, आठवड्यातील प्रत्येक दिवस हा देवांना समर्पित केला आहे. महादेवाची पूजा सोमवारी आवर्जून केली जाते. सोमवारी महादेव यांचे भाविक मनोभावे पूजा करतात. सोमवारी शिव भगवानला प्रसन्न करण्याकरता मनोभावे व्रत केली जाते. 

आपण बोलतोय, मैनपुरी शहरातील वाणेश्वर मंदिराबद्दल. हे मंदिर जुन्या मैनपुरीतील सटे गावातील गोष्ट आहे. हे मंदिर अतिशय लहान असलं तरीही खूप जूनं आहे. या मंदिरातील किस्से देखील अतिशय रंजक आहेत. नगरिया गावात हे मंदिर असल्यामुळे याला नगरिया मंदिर असं संबोधलं जातं. श्रावण महिन्यातील सोमवारी आणि महाशिवरात्री रोजी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. लांबून लाखो भक्त दर्शनासाठी येतात. 

लोकांचा असा दावा आहे की, दरवर्षी या मंदिरातील शिवलिंग सरकतं. दरवर्षी मंदिरातील शिवलिंग आपली जागा बदलत असतं. तुम्ही देखील या मंदिरात प्रवेश केलात तर हे मंदिर इतर महादेव मंदिरापेक्षा वेगळं असल्याचं तुम्हाला जाणवेल. 

आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या शिव मंदिरात घंटेच्या खाली शिवलिंग असतं. मात्र वाणेश्वर मंदिरात घंट्याच्या अगदी दोन फूट लांब शिवलिंग आहे. महत्वाची बाब म्हणजे मंदिराच्या दरवाज्याजवळच आहे शिवलिंग. मंदिरात प्रवेश केल्यावरच शिवलिंगाचं दर्शन होतं. महत्वाचं म्हणजे हे शिवलिंग सामान्य नाही. या शिवलिंगाच्या मधोमध मोठी फट दिसते. पाहिल्याच क्षणी असं जाणवेल की, या शिवलिंगावर कुणीतरी मोठ्या प्रमाणात प्रहार केले आहेत. 

हे आहे शिवलिंग सरकण्याचं कारण?

मंदिरातील शिवलिंग सरकण्यामागे गावकऱ्यांची आख्यायिका आहे की, जवळपास पन्नास ते साठ वर्षांपूर्वी गावात दुष्काळ पडलं होतं. गावकऱ्यांनी पाऊस पडावा म्हणून शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. मात्र पाऊस काही पडला नाही. यानंतर रागाने मंदिरात पुजारी भोगडानंद यांनी शिवलिंगावर कुऱ्हाडीने वार केले. आज जी शिवलिंगावर मोठी फट आहे ती याच गोष्टीची असल्याचं गावकरी म्हणतात. गावकऱ्यांचं असं देखील म्हणण आहे की,'ज्या दिवसापासून ही घटना घडली तेव्हापासून शिवलिंग आपल्या जागेवरून सरकलं आहे. 

या भीतीत असतात गावकरी?

गावकऱ्यांच्या माहितीनुसार, अनेकदा शिवलिंग सरकत सरकत अगदी मंदिराच्या द्वाराजवळ आलं आहे. कधी कधी भीती वाटते की, ते अगदी दाराबाहेर येईल. हे दृष्य पाहून लोकं थबकले मात्र पुन्हा एकदा शिवलिंग आत गेल्याची माहिती मिळाली. स्थानिकांचं असं म्हणणं आहे की, ज्या दिवशी हे शिवलिंग दाराबाहेर येईल त्यादिवशी प्रलय येईल. 

40 दिवसांत पूर्ण होतात मनोकामना?

वाणेश्वर मंदिरांबाबत असं ही म्हटलं जातं की, या मंदिरात भगवान शिवजवळ कोणतेही नवस केलं तर ते अगदी 40 दिवसांत पूर्ण होतं. 40 दिवस दररोज न चुकता शिवलिंगावर पाणी चढवलं तर त्याचा फायदा होतो. मात्र 40 दिवस महादेव आपल्या भक्ताची कडक परीक्षा घेत असतात. भक्ताला या दिवसांत अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. मात्र या परीक्षेला तोंड देत जर भक्ताने महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक केला. तर त्याचा फायदा नक्की होतो.