Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) काही दिवसांपूर्वी एका कंटेंट क्रिएटरने शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता. या व्हिडीओत महिंद्राच्या (Mahindra) एसयुव्ही (SUV) स्कॉर्पिओ (Scorpio N) कारमधून पाणी गळत असल्याचा दावा करण्यात आला होता. व्हायरल व्हिडीओत (Viral Video) कार धबधब्याखाली नेली असता सनरुफमधून पाणी गळत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. यानंतर अनेकांनी महिंद्राच्या दर्जावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं होतं. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर महिंद्राने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून जशास तसं उत्तर दिलं आहे.
डिजिटल क्रिएटर असणाऱ्या अरुण पनवार (Arun Panwar) याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला होता. अरुण पनवार डोंगर माथ्यावर असताना आपली Mahindra Scorpio N कार धुण्यासाठी धबधब्याखाली नेली होती. मात्र कार धबधब्याखाली (Waterfall) नेली असता त्यातून पाणी गळू लागल्याचा दावा त्याने केला होता. शेअर केलेल्या व्हिडीओत कार धबधब्याखाली नेली असता पाण्याने भरत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला होता.
छतावर कोसळणारं पाणी सनरुफ आणि स्पीकरमधून कारमध्ये झिरपत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. 'ही काय मस्करी आहे' असं तो व्हिडीओत म्हणत असल्याचं ऐकू येत आहे.
महिंद्राने या व्हायरल व्हिडीओला जशास तसं उत्तर दिलं आहे. महिंद्राने त्याच धबधब्याखाली आपली Mahindra Scorpio N नेत सत्य स्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चालकाने कार धबधब्याखाली नेल्यानंतर छतावर पाणी कोसळत असताना एकही पाण्याचा थेंब आतमध्ये गळत नाही. महिंद्राने हा सगळा घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद केला असून ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे.
"स्कॉर्पिओ एनसाठी धबधब्याखाली आणखी एक दिवस" अशी कॅप्शन महिंद्राने या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून महिंद्राने व्हायरल व्हिडीओत करण्यात आलेला दावा आणि सत्य स्थिती यात फरक असल्याचं दाखवून दिलं आहे.
महिंद्राने शेअर केलेला हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला दोन हजारांहून अधिक जणांनी लाईक केला असून 5.2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
Just another day in the life of the All-New Scorpio-N. pic.twitter.com/MMDq4tqVSS
— Mahindra Scorpio (@MahindraScorpio) March 4, 2023
महिंद्राने व्हायरल व्हिडीओला ज्याप्रकारे उत्तर दिलं आहे, ते पाहता अनेक युजर्सनी त्यांचं कौतुक केलं आहे. "तुमचा संदेश अगदी स्पष्ट आहे. वादाला योग्य उत्तर दिलं आहे. चांगलं खेळलात anandmahindra," अशी कमेंट एका युजरने केली आहे. तसंच एकाने ज्याप्रकारे उत्तर दिलं आहे त्याबद्दल जाहिरात आणि व्यवस्थापन टीमचं कौतुक केलं आहे.
दरम्यान एका युजरने ग्राहकाची माफी मागण्याऐवजी इतके पैसे खर्च करत आपली बाजू सांभाळली जात आहे अशी टीका केली आहे.