Crime: चार बायका सोडून गेल्या, पाचव्या बायकोने कुऱ्हाडीने प्रायव्हेट पार्ट तोडला; धक्कादायक प्रकारामुळे पोलिसही हादरले

Crime: चार बायका सोडून गेल्या मात्र, पाचव्या बायकोने संतापाच्या भरात पतीचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. हा धक्कादायक प्रकार पाहून पोलिसही हादरले आहेत. 

Updated: Mar 5, 2023, 06:23 PM IST
Crime: चार बायका सोडून गेल्या, पाचव्या बायकोने कुऱ्हाडीने प्रायव्हेट पार्ट तोडला; धक्कादायक प्रकारामुळे पोलिसही हादरले title=

Crime News : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एक अत्यंत भयानक घटना घडली आहे. एका व्यक्तीला त्याच्या चार बायका सोडून गेल्या. मात्र, पाचव्या बायकोने त्याची हत्या करत त्याचा  प्रायव्हेट पार्ट कापला आहे. या थरारक घटने मागचे कारण समजल्यावर पोलिसही हादरले आहेत. आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे (Crime News). 

मध्य प्रदेशात  सिंगरौली जिल्ह्यातील उरती गावात हा हे धक्कादायक हत्याकांड घडले आहे.  बिरेंद्र गुर्जर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 21 फेब्रुवारी रोजी बिरेंद्र याचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला होता. 

प्राथमिक तपासात पोलिसांना मृतदेहाच्या गळ्यावर आणि प्रायव्हट पार्टवर जखमा आढळून आल्या आहेत. तात्काळ पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.  शवविच्छेदन अहवालात देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
बिरेंद्र गुर्जर याच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या सर्व नातेवाईकांची चौकशी केली. तसेच त्याच्या पत्नीला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले.  पत्नीची चौकशी करत असताना पोलिसांना हत्येचा उलगडा झाला. 

कांचन गुर्जर असे आरोपी महिलेचे नाव आहे. बिरेंद्र याची चार लग्न झालली आहेत. कांचनही त्याची पाचवी पत्नी आहे. बिरेंद्र याला दारु पिण्याचे व्यसन आहे. त्याच्या याच त्रासाला कंटाळून त्याच्या पहिल्या चार पत्नी त्याला सोडून गेल्या. कांचन देखील त्याच्या या व्यसनामुळे संतप्त झाली होती. दारुच्या नशेत बिरेंद्र कांचनवर खूपच अत्याचार करत होता. दिवसेंदिवस त्याचा अतिरेक वाढतच चालला होता. यामुळे बिरेंद्रचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याचा निर्णय कांचनने घेतला. यातुनच बिरेंद्रची हत्या करण्याचा कट रचल्यानी कबुली कांचननेल पोलिसांना दिली. 

कशी केली बिरेंदरची हत्या?

काचंनने बिरेंद्रला जेवणातून झोपेच्या 20 पेक्षा अधिक गोळ्या दिल्या. जेवण जेवल्यानंतर बिरेंद्र बेशुद्ध झाला. यानंतर कांचनने बिरेंद्रवर कुऱ्हाडीने वार केले. बिरेंद्रच्या मानेवर तिने कुऱ्हाडीने वार केले. तसेच त्याच्या प्रायव्हेटपार्टदेखील तिने कुऱ्हाडीने तोडून टाकल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले. 
बिरेंद्रची हत्या केल्यानंतर तिने त्याचा मृतदेह एका तापडामध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. तसेच कुणाला शंका येवू नये यासाठी तिने रक्ताने माखलेले बिरेंद्रची कपडे आणि चप्पल जाळून टाकले.