पावसात शूज भिजू नये म्हणून जुगाड करायला गेला आणि तोंडावर पडला, पाहा व्हिडीओ

तोंडघाशी पडणं म्हणजे काय ते हा व्हिडीओ पाहून समजेल, एक जुगाड करण्याच्या नादात काय घडलं पाहा व्हिडीओ

Updated: Aug 6, 2021, 11:18 PM IST
पावसात शूज भिजू नये म्हणून जुगाड करायला गेला आणि तोंडावर पडला, पाहा व्हिडीओ title=

मुंबई: अनेकदा आपण जुगाड करायला जातो पण तेच जुगाड आपल्या अंगाशी येतात. एका व्यक्तीनं चक्क आपले शूज भिजू नये म्हणून एक जुगाड केला आहे. हा जुगार त्याच्या अंगाशी आला असं म्हणायला हरकत नाही. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता व्यक्ती आपले शूज पावसाच्या पाण्यात भिजू नये म्हणून जुगाड करतो. त्यासाठी तो दुसऱ्या माणसाला लाकडी तयार केलेली एक वस्तू तिथे ठेवायला सांगतो. त्यावरून हा व्यक्ती पलिकडे जाणार एवढ्यात त्याचा पाय घसरतो आणि तोंडावर पडतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

शूजला पाणी लागू नये आणि पावसात भिजू नये म्हणून केलेला हा जुगाड या व्यक्तीच्या चांगलाच अंगाशी आला. या व्हिडीओवर अनेक युझर्सनी हसण्याच्या कमेंट्स दिल्या आहेत. आपल्याच या जुगाडानं हा व्यक्ती तोंडघाशी पडला आहे. 

साडेचार लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. काही युझर्सनी तर हा व्यक्ती खरंच तोंडावर पडला म्हणत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. लाकूड घसरडं झालं असल्याने त्यावर हा व्यक्ती पडल्याचं अनेक जण सांगत आहेत.