गाजियाबाद: घटना आहे गाजियाबादच्या वसुंधरा सेक्टर-८ मधील बॅक्विट हॉल इथली. येथे केवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात एकाची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी पिस्तुलासह फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
ही घटना घडल्यावर उपस्थितांनी दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. इंदिरापुरम पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत असून, पकडण्यात आलेल्या आरोपींचा विवाहस्थळी वावरण्याचे कारण काय होते याचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
दिल्ली येथील सुंदरनगरी येते एकरार नावाचा व्यक्ती बॅण्डचा व्यवसाय करतो. त्याने दिलेल्या माहितीनुसार एका लग्नात त्याला ५०० रूपयांचे बक्षिस मिळाले होते. मिळालेले पैसे सहकाऱ्यांना समान वाटल्यास प्रत्येकी ५० रूपये येणार होते. याच ५० रूपयांच्या मुद्द्यावरून साजिद नावाच्या व्यक्तीने अबरार नावाच्या सहकाऱ्याची हत्या केली. त्याने ३२ बोर पिस्तूलाने तीन राऊंड फायर करत अबरारवर गोळीबार केला.
घडल्या प्रकाराची दाहकता लक्षात येताच उपस्थितांनी दोन आरोपींना पकडले. मात्र, गर्दी आणि गोंधळाचा फायदा घेत गोळीबार करणारा मुख्य आरोपी पळून गेला.
दरम्यान, इंदिरापुरमचे पोलिस अधिकारी राकेश मिश्र यांनी सांगितले की, मृत व्यक्तीचा भाऊ इकरारने तक्रार दिली आहे. गुलफा आणि साजित तसेच, नीरज यांनी मिळून आपल्या भावाची हत्या केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.