#METOO प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी घेतली गंभीर दखल

#METOO  प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी गंभीर दखल घेतली आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Oct 12, 2018, 05:11 PM IST
#METOO प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी घेतली गंभीर दखल  title=

नवी दिल्ली : हॅश टॅग मी टू प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणांच्या जनसुनावणीसाठी निवृत्त न्यायमूर्तींची चार सदस्यीय समिती नियुक्त करणार असल्याचं मनेका गांधींनी सांगितलंय. मेनका गांधी म्हणाल्या, 'मला प्रत्येक तक्रारीचा त्रास आणि धक्का समजू शकते.' कोणाला किती वेदना झाल्यात याची गांभिर्य लक्षात घेऊन चौकशीचा निर्णय घेतला गेलाय. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे, असे त्या म्हणाल्यात.

महिलांच्या लैंगिक अत्याचाराविरूद्ध, सोशल नेटवर्किंग साइट आतापर्यंत मीटू मोहिमेत अनेक प्रसिद्ध नावे पुढे आली आहेत. या प्रकरणाची गंभीरता समजून घेण्यासाठी केंद्र सरकारने आता पावले उचलली आहेत. मीटू प्रकरणी आता यावर कारवाई करण्यास सरकारची तयारी सुरु झालेय. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांनी या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी एक समिती स्थापन केलेय.

 शुक्रवारी एका कार्यक्रमास संबोधित करताना मेनका गांधी यांनी स्पष्ट केले की लवकरच समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीमध्ये न्यायाधीश आणि कायदा तज्ञांचा समावेश असेल, जो या प्रकरणाची प्रथम तपासणी करेल आणि नंतर ते त्याबाबत सुनावणी करतील. मेनका गांधी यांनी सांगितले की, सुनावणीसाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची चार सदस्यीय समिती स्थापन केली.

दरम्यान,  #METOO अंतर्गत संस्कारी बाबूजी आलोक नाथांवर गंभीर आरोप झालेत...आता आलोक नाथ यांच्या अडचणीत अजून भर पडली असून अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनीही आलोक नाथ मनमौजी व्यक्ती असल्याचं म्हंटलंय..आलोक नाथांचा स्वभाव आपल्याला आधीपासून माहीती होता..त्यामुळे त्यांच्यावर जे आरोप होतायेत ते खऱेच असल्याचं हिमानी शिवपुरी यांनी म्हंटलंय.

'मी टू' वादळात आता बॉलिवूडचे 'शो मॅन' अशी ओळख असलेले दिग्दर्शक सुभाष घई यांचेही नाव आले आहे. घई यांच्या कंपनीतील एका माजी कर्मचारी महिलेने घई यांच्यावर आरोप केले आहेत. घई यांनी पेयातून गुंगीचं औषध दिलं त्यानंतर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेनं केलाय. या महिलेने आपले नाव गुप्त ठेवले असून तिची व्यथा लेखिका महिमा कुकरेजाने एका पोस्टच्या माध्यमातून ट्विटरवर मांडली आहे. दरम्यान, ७३ वर्षीय घई यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून संबंधित महिलेविरुद्ध मानहानीचा दावा ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.