मुंबई : जगभरात ओमायकॉन (Omicron verient) व्हायरस धुमाकूळ घातला असताना आता कोरोनाचा (Corona) हा नवीन प्रकार देशातही वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाच्या नव्या धोक्याबाबत पूर्णपणे सतर्क आहेत. देशभरात आतापर्यंत एकूण 200 ओमायक्रॉनची रुग्ण (Omicron cases) आढळून आली आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
ओमायक्रॉनच्या धोक्यात अनेक राज्यांनी ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या पार्ट्या (New Year celebration) टाळण्यास सांगितले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की, आम्ही नवीन वर्षाच्या सार्वजनिक उत्सवावर बंदी घातली आहे. तसेच 50 टक्के आसन क्षमता असलेल्या क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये डीजेसारख्या विशेष कार्यक्रमांशिवाय मेळाव्यास परवानगी आहे. या काळात संपूर्ण लसीकरण अनिवार्य आहे. हे निर्बंध 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत लागू असतील.
गुजरातमध्ये आठ शहरात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे
ओमायक्रॉनच्या वाढत्या घटनांमुळे गुजरातने राज्यातील 8 प्रमुख शहरांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, जामनगर, भावनगर, गांधीनगर आणि जुनागढमध्ये वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर 2021 च्या रात्रीपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्रीच्या कर्फ्यूची वेळ दुपारी 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असेल. (Night curfew in Gujrat)
मुंबईत कलम 144 लागू
दरम्यान, ओमायक्रॉन प्रकाराची वाढती प्रकरणे लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) लोकांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीत जाणे टाळण्यास सांगितले आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुंबईत कलम 144 लागू केले आहे. या दरम्यान, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी समुद्रकिना-यावर किंवा पर्यटन स्थळांवर पार्ट्यांना परवानगी दिली जाणार नाही. उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. ओमायक्रॉनच्या आतापर्यंत नोंदवलेल्या सर्व प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. (Section 144 in Mumbai)
ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र आणि मुंबईत
ओमायक्रॉनची प्रकरणे देशभरात 200 पर्यंत वाढली आहेत. मंगळवारी, ओमायक्रॉनची 18 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दिल्लीत 6, कर्नाटकात 5, केरळमध्ये 4 आणि गुजरातमध्ये 3 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉनची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनची सर्वाधिक 54 प्रकरणे आहेत. (Omicron Cases in maharashtra)