लग्नमंडपसोडून पोलीस स्टेशनमध्येच 'शुभमंगल'

लग्न पोलीस स्टेशनमध्येच लावून देण्यात आलं, कारण पुन्हा मंडपमध्ये जावून वातावरण आणखी तणावाचं होण्याची शक्यता होती.

Updated: Nov 24, 2017, 02:31 PM IST
लग्नमंडपसोडून पोलीस स्टेशनमध्येच 'शुभमंगल'

कन्नौज : लग्न मंडपात लग्नाला काही वेळ उशीर असतानाच, वधूच्या आत्याच्या श्रीमुखात एकाने लगावल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. हा किस्सा उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील आहे.

वर-वधू पक्ष पोलीस स्टेशनमध्ये

दोन्ही पक्ष ऐकमेकांच्या समोर उभे ठाकले. अनेक वेळ चर्चा आणि भांडण झाल्यानंतर, प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं तेव्हा, पोलिसांनी मध्यस्थी केली, दोन्ही पक्षातील लोकांना समज दिली आणि लग्न पोलीस स्टेशनमध्येच लावून देण्यात आलं, कारण पुन्हा मंडपमध्ये जावून वातावरण आणखी तणावाचं होण्याची शक्यता होती.