स्टेट बँकेनं ग्राहकांच्या सुविधेसाठी लॉन्च केलं YONO

भारतीय स्टेट बँकेनं गुरुवारी एक नवं मोबाईल अॅप लॉन्च केलंय. 

Updated: Nov 24, 2017, 02:12 PM IST
स्टेट बँकेनं ग्राहकांच्या सुविधेसाठी लॉन्च केलं YONO  title=

मुंबई : भारतीय स्टेट बँकेनं गुरुवारी एक नवं मोबाईल अॅप लॉन्च केलंय. 

गुरुवारी स्टेट बँकेनं UONO (यू ओन्ली नीड वन) नावाचं मोबाईल अॅप लॉन्च केलं. दररोजच्या व्यवहारातील ६० सेवा एकाच ठिकाणी वापरण्याची संधी ग्राहकांना या मोबाईल अॅपवर मिळणार आहे. 

UONO या मोबाईल अॅपच्या साहाय्यानं तुम्ही उबर किंवा ओला टॅक्सी बुकींग करू शकाल... त्याचवेळी तुम्ही जेबाँग, मॅक्स फॅशन, मिंत्रा अशा वेबसाईटवर शॉपिंगही करू शकाल. 

यामध्ये १४ वेगवेगळ्या श्रेणींमधील पुस्तकं, कॅब बुकींग, मनोरंजन, खादयपदार्थ, ट्रॅव्हल आणि मेडिकल सेवा उपलब्ध असतील. यासाठी बँकेनं तब्बल ६० ई-कॉमर्स कंपन्यांसोबत हातमिळवणी केलीय.