विवाहित महिलेला तरुण भेटायला गेला खरा, पण पुढे कहाणीमध्ये एक ट्वीस्ट आला

  प्रेमात व्यक्ती काहीही करण्याची तयारी दोखवतो. परंतु हेच प्रेम कधीकधी माणसाला राक्षसाच्या रुपात घेऊन येतं, ज्याचा त्याला थांगपत्ता देखील लागत नाही.

Updated: Apr 2, 2022, 06:38 PM IST
विवाहित महिलेला तरुण भेटायला गेला खरा, पण पुढे कहाणीमध्ये एक ट्वीस्ट आला title=

मुंबई :  प्रेमात व्यक्ती काहीही करण्याची तयारी दोखवतो. परंतु हेच प्रेम कधीकधी माणसाला राक्षसाच्या रुपात घेऊन येतं, ज्याचा त्याला थांगपत्ता देखील लागत नाही. अशी ही बिहारमधील घटना समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. कारण प्रेम करणं एका तरुणाच्या जिवावर बेतलं आहे. येथे एका तरुणाचे शेजारी राहणाऱ्या विवाहीत महिलेसोबत प्रेम जुळलं ही महिला तीन मुलांची आई आहे. एके दिवशी जेव्हा या विवाहितेचा नवरा घरी नव्हता, तेव्हा तिने आपल्या प्रियकराला भेटायला बोलावले. परंतु त्यावेळी या महिलेचा नवरा घटनास्थळी पोहोचला आणि त्यानंतर यांची कहाणी अशी काही पलटली की, जणू तुम्हाला वाटेल ही एखाद्या सिनेमातील कहाणी असावी.

खरेतर पोलीसांना जेव्हा अनिलकुमार महतो नावाच्या व्यक्तीचं शरीर जंगलात सापडलं तेव्हा गावात आणि परिसरात खळबळ उडाली. ज्यानंतर विवाहबाह्य प्रेमसंबंधाचे भयंकर परिणाम स्थानिक पोलिसांनी उघड केले आहेत.

अनिलकुमार महतोच्या हत्येने गावात आणि परिसरात खळबळ उडाली होती. नातेवाईकांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची ही घटना राजनगर ठाणे परिसरातील परिहारपूर नोनिया टोला येथील प्रभाग क्रमांक-8 ची आहे.

घटनेच्या अवघ्या ४ दिवसांत या हत्येचे आरोपी पोलिसांनी शोधून काढले आहेत. चौकशीदरम्यान तरुणाची विवाहित प्रेयसी आणि तिच्या पतीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी सांगितले की, महिलेने मध्यरात्रीनंतर प्रियकराला भेटण्यासाठी बोलावले होते. तेव्हा अनिल त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी पोहोचला. काही वेळाने महिलाही घटनास्थळी पोहोचली. रात्रीच्या अंधारात दोघेही रोमान्स करू लागले. तर दुसरीकडे महिलेच्या नवऱ्याला याची माहिती मिळाली होती. त्यामुळे तो आपल्या बायकोचा पाठलाग करत घटनास्थळी पोहोचला आणि आपल्या बायकोला दुसऱ्या व्यक्तीच्या मिठीत पाहून या नवऱ्याला राग आहे.

नवऱ्याने जेव्हा बायकोला आणि अनिलकुमारला या सगळ्या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा, अनेलला राग अनावर झाला. ज्यामुळे तो या महिलेच्या नवऱ्याला मारायला धावून आला. परंतु आपल्या नवऱ्यावर हल्ला होताना पाहून बायकोने आपल्या नवऱ्याची बाजू घेण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर या नवरा-बायकोनं मिळून प्रियकर अनिलचाच गळा आवळून त्याला संपवलं. तरुणाची हत्या केल्यानंतर या नवरा-बायकोनं त्याचा मृतदेह घटनास्थळापासून दूर फेकून दिला.

पोलिसांनी सांगितले की, तरुण आणि विवाहितेचे गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघेही घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न करत होते. त्याआधी त्यांनी भेटायचं ठरवलं होतं. सध्या पोलिसांनी पती-पत्नीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.