नवी दिल्ली : आपल्या वेबसाईटवर दिलेल्या सूचनेनुसार 23 फेब्रुवारी आणि 10 जुलै 2017 च्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या डिझायर या गाड्या परत बोलावणार आहे.
भारतातली सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारूती सुझुकी तिच्या डिझायर या सेडान क्लास कारसाठी एक मोठं सर्विस कॅंपेन सूरू करतेय. डिझायर या सेडान क्लास कारच्या मागच्या चाकात दोष असल्याचं लक्षात आल्यावर मारूतीने हा निर्णय घेतला आहे.
3 ऑक्टोबर 2017 पासून या सर्विस कँपेनची सुरूवात होणार आहे. याचे डिलर्स या संदर्भात ग्राहकांशी संपर्क साधणार आहेत. त्यानंतर कारची तपासणी करून सदोष भाग बदलून देण्यात येणार आहे. ही सेवा मोफत असणार आहे.
ऑक्टोबरमध्ये डिझायर या मॉडेलच्या एक लाख गाड्या विकल्या गेल्यात. डिझायरमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. यात स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टीम, अॅपल कारप्ले, मिरर लिंक टेक्नॉलॉजी, उत्तम माईलेज या सर्व सुविधा ग्राहकांना आवडल्या आहेत.