गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न; उद्धव ठाकरेदेखील उपस्थित

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. 

Updated: Sep 26, 2021, 03:44 PM IST
गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न; उद्धव ठाकरेदेखील उपस्थित

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बेठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडे यांचा सहभाग होता. 

गृहमंत्र्यानी अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चोहान, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आदी उपस्थित होते. या बैठकीत नक्षलग्रस्त भागात सुरक्षा, रस्ते, शाळा, पूल आणि आरोग्य केंद्रांचे काम या विकास कामांचा आढावा गृहमंत्र्यांनी घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

बैठकीनंतर अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, नितिश कुमार आणि शिवराजसिंग चौहान यांच्यासह स्नेहभोजन घेतले. ही बैठक संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता होती. परंतु ते थेट मुंबईकडे रवाना होण्यासाठी विमानतळाकडे निघाले.