Corona : होळी, ईद, ईस्टरच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या महत्वपूर्ण सूचना

महाराष्ट्रासह देशभरात वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्र सरकारनेही आता राज्यांना काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. एकीकडे देशभरात कोरोनाचा आलेख वाढतोय, तर दुसरीकडे अनेक सण-उत्सव तोंडावर आलेत. 

Updated: Mar 26, 2021, 08:38 PM IST
Corona : होळी, ईद, ईस्टरच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या महत्वपूर्ण सूचना  title=

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्र सरकारनेही आता राज्यांना काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. एकीकडे देशभरात कोरोनाचा आलेख वाढतोय, तर दुसरीकडे अनेक सण-उत्सव तोंडावर आलेत. 

केंद्र सरकारने राज्यांना काय दिल्या सूचना?

होळी, शब-ए-बारात, बैसाखी, ईद-उल-फितरच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्यांनी कडक पावलं उचलायला हवी. कोविडसंदर्भातल्या नियमावलीचं सर्वत्र पालन होत आहे की नाही, यावर राज्य सरकारने लक्ष ठेवले पाहिजे. खासकरून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग तर होत नाही ना? याचीही खबरदारी घेतली पाहिजे. 

देशाची राजधानी दिल्ली असूदे किंवा महाराष्ट्राची राजधानी मुंबई, सगळीकडेच कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. दररोज नव्या रुग्णसंख्येचा विक्रम मोडला जातोय. अशात होळी, बैसाखी, ईद, ईस्टरसारखे अनेक सण असल्याने गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. 

काल देशभरात ५९ हजार नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यात सगळ्यात जास्त रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात वाढते. देशात नव्या रुग्णांची संख्या ही २० हजाराखाली आलेली. मात्र आता तीही वाढू लागल्याने केंद्र सरकारने सणांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत.