गोव्यात लढाऊ विमान MiG-29K क्रॅश

उड्डाणाच्या काही वेळातच विमान दुर्घटनाग्रस्त झालं.

Updated: Nov 16, 2019, 01:27 PM IST
गोव्यात लढाऊ विमान MiG-29K क्रॅश title=
फोटो सौजन्य : ट्विटर

पणजी : गोव्यात शनिवारी दुपारी ट्रेनिंग मिशनसाठी रवाना झालेलं MiG-29K लढाऊ विमान उड्डाणाच्या काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या लढाऊ विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ट्रेनिंगसाठी या विमानाचं उड्डाण करण्यात आलं होतं.

गोवा: इंजन में आग लगने से फाइटर एयरक्राफ्ट MiG-29K क्रैश, ट्रेनिंग के लिए भरी थी उड़ान
फोटो सौजन्य : ट्विटर

नौदल प्रवक्ता कमांडर, विवेक मधवाल यांनी सांगितलं की, मिग-२९के (MiG-29K) या प्रशिक्षणार्थी विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. आग लागल्यामुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचं बोललं जात आहे. पायलट कॅप्टन एम.शोकंद आणि लेफ्टनंट कमांडर दीपक यादव यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. गोव्यातील आयएनएस हंसा येथून विमानाचं उड्डाण करण्याच आलं होतं. 

नौदलाकडून अधिक तपास सुरु आहे.