Maharashtra Politics : मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक सूरतमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार

शिवसेनेचे दोन नेते सूरतमध्ये दाखल झाले असून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत

Updated: Jun 21, 2022, 04:35 PM IST
Maharashtra Politics : मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक सूरतमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार title=

योगेश खरे, झी मीडिया, सूरत : शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या समर्थक आमदारांसह सध्या सूरतमध्ये आहेत. भाजपशी वाटाघाटी सुर असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचा मुक्कात सूरतमधल्या ग्रँड भगवती हॉटेलमध्ये असून त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार उपस्थित आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे दोन नेते सूरतमध्ये दाखल झाले आहेत. मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

दरम्यान, हॉटेलजवळ मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांची गाडीह पोलिसांनी अडवली होती. जोपर्यंत ओळख पटत नाही तोपर्यंत हॉटेलमध्ये सोडायचं नाही असा पोलिसांना आदेश होता. पण त्यानंतर त्यांची गाडी सोडण्यात आली. त्यानंतर आता थोड्याचवेळात नार्वेकर आणि फाटक एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.