Milk Price : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. जर तुम्ही दूध (Milk) आणि दही (curd) घेण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण Mother Dairy नंतर अजून एका कंपनीने दुधाचे दर (Milk Price) वाढवले आहेत.
कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी ब्रँडचे (KMF) दूध प्रति लिटर आणि दही प्रति किलो यांच्या दरात 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आजपासून हे नवीन दर लागू होणार आहे. विशेष दूध, शुभम, समृद्धी आणि संतृप्ति आणि दही यासह 9 प्रकारच्या दुधाच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
डबल टोन्ड दुधाचा दर आता 38 रुपये, टोन्ड दूध 39 रुपये, होमोजिनाइज्ड टोन्ड दूध 40 रुपये, होमोजिनाइज्ड गायीचे दूध 44 रुपये, विशेष दूध 45 रुपये, शुभम दूध 45 रुपये आहे. समृद्धी दूध 50 आणि संतृप्त दूध 52 रुपये प्रतिलिटर असेल. नंदिनी दहीची किंमत 47 रुपये असेल. (milk mother dairy amul nandini milk and curd price hike november 24)
अमूल (Amul) दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवीन दर 17 ऑगस्ट लागू झाले. त्यानंतर मदर डेअरीनेही आपल्या दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. ग्राहकांना 2 रुपयांच्या वाढीव किमतीसह 61 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे.