एक मिस कॉल आला आणि भाऊ थेट बांगलादेशला पोहोचला, पण... भारतीय मुलाच्या लव्ह स्टोरीचा असा झाला 'The End'

Bangladesh News : खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या एका तरुणाला बांगलादेशातील कुश्तिया जिल्ह्यातील एका तरुणीचा मिस कॉल आला होता. त्याने उत्तर देण्यासाठी परत फोन केला तेव्हा पलीकडून मुलीच्या तोंडून हॅलो ऐकताच तो प्रेमात पडला. आवश्यक कागदपत्रे नसतानाही, त्याने बांगलादेशला जाण्याचे ठरवले.

आकाश नेटके | Updated: Jun 2, 2023, 06:43 PM IST
एक मिस कॉल आला आणि भाऊ थेट बांगलादेशला पोहोचला, पण... भारतीय मुलाच्या लव्ह स्टोरीचा असा झाला 'The End' title=
(फोटो सौजन्य - PTI)

Missed Call Love Story : आपलं प्रेम मिळवण्यासाठी प्रेमी युगुल कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करतं. मात्र कधीकधी हे प्रयत्न चांगलेच अंगाशी येतात. असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालमधील (West Benagal) मुर्शिदाबाद जिल्ह्यात घडलाय. एका तरुणासोबत घडलेल्या प्रकाराने या प्रकाराने त्याला जन्माची अद्दल घडवली आहे. 21 वर्षीय मुलाला प्रेमाची किंमत चुकवण्यासाठी तब्बल तीन वर्षे बांगलादेशच्या (Bangladesh) तुरुंगात राहावे लागलं आहे. एका अनोळखी नंबरवरून आलेल्या 'मिस्ड कॉल'मुळे या तरुणाला बांगलादेशातील तुरुंगात 3 वर्षे काढावी लागली आहेत.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे राहणाऱ्या अम्फान शेखला अज्ञात क्रमांकावरून आलेल्या मिस कॉलवर बोलल्याने 3 वर्षांची शिक्षा भोगावी लागली आहे. 21 वर्षीय अम्फानचे मोबाईल रिचार्जचे दुकान होते. पण अचानक एके दिवशी आलेल्या मिस कॉलने त्याला प्रेमाची अशी काही भुरळ पडली जी तो आयुष्यभर विसरु शकणार नाही. धक्कादायक बाब म्हणजे अम्फानला केवळ तीन महिन्यांची शिक्षा झाली होती. मात्र त्याला आयुष्यातील तीन वर्षे बांगलादेशात घालवावी लागली आहेत.

अम्फानला एके दिवशी बांगलादेशातील कुश्तिया जिल्ह्यातील एका मुलीचा मिस कॉल आला होता. त्यानंतर त्याने मिस कॉल देणाऱ्या मुलीला फोन केला. दोघांमध्ये बराचकाळ संभाषण सुरु होतं. बोलता बोलता तो तरुणीच्या प्रेमात पडला. यानंतर त्याने तरुणीला भेटण्यासाठी बांगलादेशला जायचे ठरवले. अपुऱ्या कागदपत्रांशिवाय अम्फानने बांगलादेशात प्रवेश केल्यामुळे त्याला पकडण्यात आले. बेकायदेशीर घुसखोरीमुळे अम्फान शेखला 3 महिन्यांची शिक्षा झाली होती, पण राजनैतिक कारभाराच्या अडचणींमुळे त्याला जवळपास 3 वर्षे तुरुंगात राहावे लागले.

शेखचे नशीब इतके वाईट होते की बांगलादेशात प्रवेश केल्यावरच त्याला पकडण्यात आले.  2020 मध्ये तो भारताची सीमा ओलांडून बांगलादेशला गेला होता पण परत येताना पकडला गेला. बेकायदेशीर घुसखोरीच्या आरोपाखाली त्याला 3 महिन्यांची शिक्षा झाली होती. त्यानुसार अम्फानलाला 90 दिवस तुरुंगात घालवायचे होते. पण काही राजनैतिक कामकाजामुळे त्याला 3 वर्षे बांगलादेशच्या तुरुंगात काढावी लागली.

याआधीही घडलाय असाच प्रकार

दरम्यान, याआधीही पश्चिम बंगाल आणि बांगालदेश सीमा परिसरात अशा लव्ह स्टोरी पाहायला मिळाल्या आहेत. अनेकांना या प्रेम प्रकरणांमुळे तुरुंगवास भोगावा लागला आहे. बिहारच्या भागलपूरमधील एका व्यक्तीचे तीन मुलांच्या आईवर प्रेम जडले होते. मिस्ड कॉलमुळेच गावातीलच एक तरुण तीन मुलांच्या आईच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर रात्री तो महिलेच्या घरी पोहोचला. यावेळी गावकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीतच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.