मुंबई : डिजिटल पेमेंट कंपनी MobiKwik चा IPO बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्केट रेग्युलेटर (SEBI)ने कंपनीच्या इश्यूला मंजूरी दिली आहे. IPOच्या माध्यमातून MobiKwikचे 1900 कोटी रुपये उभारण्याचे नियोजन आहे. या डिजिटल पेमेंट कंपनीने जुलैमध्ये आयपीओसाठी SEBIकडे कागदपत्र जमा केले होते. त्यामुळे दिवाळीपर्यंत मोबिक्विकचा आयपीओ येण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत मोबिक्विकडून अद्याप कोणताही रिस्पांस आलेला नाही. IPOमध्ये फ्रेश इक्विटी शेअर जारी करण्यात येणार असून ऑफर फॉर सेलसुद्धा असणार आहे.
1500 कोटींचे फ्रेश इक्विटी शेअर
मोबिक्विकचा आयपीओ 1900 कोटींचा असणार आहे. यामध्ये 1500 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर जारी करण्यात येणार आहे. तसेच 400 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल
(OFS) असतील. ज्याद्वारे प्रमोटर्स आपली भागीदारी कमी करतील.
आयपीओतून येणाऱ्या रक्कमेचा वापर ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक ग्रोथसाठी करण्यात येणार आहे. याशिवाय जनरल कॉर्पोरेट उद्देशांसाठी फंडचा वापर होईल. One MobiKwik सिस्टिम भारतातील लिडिंग मोबाईल वॉलेट आहे.