Modi Cabinet Expansion 2021: कोण आहेत जे खासदार नाहीत, मात्र मोदी यांनी बनविले मंत्री !

केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपचे (BJP) तमिळनाडूचे अध्यक्ष एल. मुरुगन ( L. Murugan) यांना पक्षाचे कमी कालावधीत चांगले काम केल्याने या कामाचे फळ म्हणून त्यांना स्थान देण्यात आले आहे.  

Updated: Jul 8, 2021, 08:25 AM IST
Modi Cabinet Expansion 2021: कोण आहेत जे खासदार नाहीत, मात्र मोदी यांनी बनविले मंत्री ! title=

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपचे (BJP) तमिळनाडूचे अध्यक्ष एल. मुरुगन (Tamil Nadu BJP president L. Murugan) यांना पक्षाचे कमी कालावधीत चांगले काम केल्याने या कामाचे फळ म्हणून त्यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, ते दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तमिळ असूनही मुरुगन यांना नव्याने संधी मिळाली आहे. 

तामिळनाडूत पक्षासाठी चांगले काम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील नवीन मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष एल मुरुगन यांचा समावेश आहे.  खरे तर, तामिळनाडूमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन दशकांनंतर भाजपाला चार जागा जिंकण्यात यश आले. अशा परिस्थितीत एल मुरुगन यांना यासाठी बक्षीस म्हणून बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. असे मानले जात आहे की, चांगल्या कामगिरीमुळे मुरुगन यांना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. कारण मार्च 2020 मध्ये मुरुगन भाजपचे तामिळनाडू राज्याचे अध्यक्ष बनले, तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांच्या हातात केवळ एक वर्ष होते. असे असूनही, त्यांची कामगिरी उत्कृष्ट होती.

मोदी सरकारचे युवा कॅबिनेट, 35 वर्षांचा हा तरुण चेहरा

तामिळनाडूतील द्रविड विचारधारेच्या मुळात खोलवर रुजलेल्या हिंदुत्ववादी पक्षाचे नेतृत्व करणे मुरुगनसाठी सोपे काम नव्हते, परंतु त्यांनी मोठ्या चतुराईने दोन्ही विचारधारा संभाळत राष्ट्रवाद कायम ठेवत त्यांनी आपल्या पक्षाचे काम केले. केंद्रीय मंत्रिमंडळात मुरुगन यांच्या स्थानाबद्दल राजकीय विश्लेषक सांगतात की, भाजप प्रदेशाध्यक्षांनी परिश्रम घेतले आणि त्यामुळे पक्षाने राज्यात चार विधानसभा जागा जिंकल्या. त्याचवेळी मुरुगन स्वत: निवडणुकीत अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले होते.

मुरुगन दलित नेते म्हणून सक्रिय

भाजपचे प्रवक्ते नारायणन तिरुपती म्हणाले की, मुरुगन हा एक कष्टकरी, खूप सक्रिय आणि उत्साही तरुण आहे. जेव्हा पक्षाने त्याला प्रदेशाध्यक्ष केले, तेव्हा त्यांनी ते आव्हान म्हणून घेतले. वीस वर्षांपासून तळागाळातील कामगार म्हणून काम करणारे दलित नेते मुरुगन हे भाजपमध्ये येण्यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. तो त्यांच्या संघटनात्मक कौशल्यांसाठीही ओळखला जातो.

धारापुरममधून कमी मतांच्या फरकाने पराभव

मुरुगन विधानसभा निवडणुकीत धारापूरम (राखीव) मतदारसंघातून 1,393 मतांच्या फरकाने पराभूत झाले. 2001 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचे सहयोगी म्हणून भाजपला चार जागा जिंकता आल्या. यावेळी अण्णाद्रमुकच्या सहयोगी पक्षाने विजयाची तीच कहाणी पुन्हा पुन्हा दाखविली आणि चार जागा जिंकल्या.