मुंबई : देशातील कोरोना संकटामुळे 21 दिवस लॉकडाउन लागू आहे. लॉकडाईन दरम्यान देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८ हजारावर गेली आहे. त्यामुळे मोदी सरकार पुन्हा २ आठवडे लॉकड़ाऊन वाढवू शकते. पण या दरम्यान काही गोष्टींसाठी सूट दिली जावू शकते.
कोरोना फुल कवरेजची लिटॅया येथे क्लिझिक करा
लॉकडाऊन वाढवल्यानंतर सरकार शेतमजूर आणि कृषी उद्योगाशी संबंधित लोकांसाठी विशेष रेल्वे आणि बस सेवा सुरु करु शकते. अशा मजकूरांना विशेष पॅकेज देण्याबाबत काम चालू आहे. त्याच्याबरोबरच औद्योगिक क्षेत्र सुरु करण्याबाबत ही विचार सुरु आहे.
सोमवारी संयुक्त सचिव पदावरचे सर्व मंत्री आणि अधिकारी लॉकडाऊन वाढवल्यानंतर आर्थिक बाजु सक्षम करण्यासाठी काम करतील. पंतप्रधान मोदी लवकरच लॉकडाऊन वाढण्याबाबत घोषणा करतील अशी देखील शक्यता आहे.
रेल्वेने आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी 236 पार्सल स्पेशल ट्रेन सुरु केले आहेत. अल्पकाळ राहणारे उत्पादन, कृषी, दूध आणि डेयरी उत्पादन यांचा पुरवठा त्वरीत करण्यात येईल.
रेल्वेने देशातील प्रमुख शहरे आणि राज्य मुख्यालय यांना राज्यातील सर्व भागांसोबत जोडलं आहे.