मोदी सरकारचा 'हा' निर्णय चीनला पडणार महागात! कसे होईल मोठे नुकसान? जाणून घ्या

Chinese glass Import: देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Sep 2, 2023, 04:09 PM IST
मोदी सरकारचा 'हा' निर्णय चीनला पडणार महागात! कसे होईल मोठे नुकसान? जाणून घ्या  title=

Chinese glass Import: चीन सीमेवर भारताला आव्हान देताना दिसतो. दुसरीकडे भारतात चीनी वस्तूंचा शिरकाव वाढला आहे. अशावेळी विविध मार्गांनी चीनच्या धोरणांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. याचाच एक प्रत्यय आता कॉमर्स मंत्रालयाच्या निर्णयात दिसून येतआहे.

देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. यामुळे देशांअतर्गत असलेल्या कंपन्या चीनमधून येणार्‍या वस्तूंची कमी खरेदी करतील. या वस्तूंवर डंपिंग शुल्क लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान शुल्क लागू करण्याबाबतचा अंतिम निर्णय वित्त मंत्रालय घेणार असल्याचे सांगण्यात आहे. 

GOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी

चायनीज काचेवर शुल्क लावण्याची मागणी

एका देशांतर्गत कंपनीने यासंदर्भात तक्रार दाखल केली. यानंतर वाणिज्य मंत्रालयाची तपास शाखा व्यापार उपाय महासंचालनालयने (DGTR) चीनमध्ये बनणाऱ्या किंवा तिथून निर्यात होणाऱ्या1.8 मिमी ते 8 मिमीपर्यंत तसेच आणि 0.4 वर्ग चौरस मीटर जाडीच्या किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या कडक काचांच्या  कथित डंपिंगची चौकशी केली आहे.

ग्लास प्रोसेसिंगची सुरक्षा/विशेषतेसाठी असणाऱ्या 'फेडरेशन ऑफ सेफ्टी ग्लास'ने डंपिंगविरोधी तपास सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. उत्पादनांच्या डंपिंगमुळे देशांतर्गत उद्योग प्रभावित होत असल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला होता.

Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

दरम्यान, डीजीटीआरने यासंदर्भात चौकशी केली. यानंतर उत्पादनाची भारतात सामान्यपेक्षा कमी किमतीत निर्यात केली जात आहे, ज्यामुळे डंपिंग होत आहे आणि देशांतर्गत उत्पादकांवर परिणाम होत आहे, असे निरीक्षण या चौकशीनंतर नोंदवण्यात आले.

'मोदी एक्सप्रेस' जाणार कोकणात, खाण्या-पिण्याचीही सोय

मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गणपतीला जाणाऱ्यासाठी तुम्ही अजूनही तिकीट काढले नसाल किंवा कन्फर्म झाले नसेल तरी काळजी करु नका. कारण आता मोदी एक्सप्रेसने थेट तुम्हाला कोकणात जाता येणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.यंदाची मोदी एक्सप्रेस स्पेशल आहे. कारण 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपण मोदी एक्सप्रेस सोडत असल्याचे नितेश राणे यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोकणवासियांना गिफ्ट देण्यात आले आहे. तिकिट कन्फर्म न होणे, खासगी बस चालकांनी वाढवलेले भाडे यामुळे चाकरमानी त्रस्त होते. त्यांना आता मोदी एक्सप्रेसमुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.17 सप्टेंबरला सकाळी साडेबाराला दादरच्या फलाट क्रमांक 8 वरून मोदी एक्सप्रेस दरवर्षीप्रमाणे सुटणार आहे. 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान याचे बुकिंग केले जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.