मुंबई : 'तीन तलाक'ला सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून या निर्णयाबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर काहींना धार्मिक विषयांमध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करू नये, असंही म्हणलं आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या मोहम्मद कैफनं तीन तलाकच्या निर्णयाबद्दल ट्विट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना सुरक्षा आणि न्या मिळेल असं ट्विट मोहम्मद कैफनं केलं आहे.
Welcome decision by Supreme Court to declare #TripleTalaq unconstitutional. Will give Muslim women security. Gender justice is much needed
— Mohammad Kaif (@MohammadKaif) August 22, 2017