चिखलात रंगली मुंगूस आणि सापाची झुंज, कोण जिंकलं? Viral Video पाहून तुम्हीच ठरवा

किंग कोब्रा आणि मुंगूस यांची झुंज पाहायला मिळत आहे. या लढाईत कोणी बाजी मारली? व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीच ठरवा. 

Updated: Aug 31, 2022, 07:18 PM IST
चिखलात रंगली मुंगूस आणि सापाची झुंज, कोण जिंकलं? Viral Video पाहून तुम्हीच ठरवा title=

Viral Video On Internet: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. असे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून नेटकऱ्यांचं मनोरंजन होत असतं. या व्हायरल व्हिडीओमध्ये सर्वाधिक पसंती ही सापांच्या व्हिडीओंना मिळते. कारण नेटकऱ्यांना सापाच्या जगाबाबत कायमच कुतुहूल असतं. त्यामुळे सापाचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात किंग कोब्रा आणि मुंगूस यांची झुंज पाहायला मिळत आहे. या लढाईत कोणी बाजी मारली? व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीच ठरवा. 

किंग कोब्रा मुंगूसचा खेळ संपवण्यासाठी वारंवार हल्ला करतो. पण मुंगूस सुद्धा हार न मानता त्याच्याशी लढाई करतो. सुरुवातीला दोघेही हार मानायला तयार नाहीत. सरतेशेवटी मुंगूस किंग कोब्राल पळवून लावतो. मुंगूसने ही लढाई जिंकली असून किंग कोब्राला पराभवाची चव चाखली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तसेच लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.